पोषणकर्त्याला सोडले वाऱ्यावर

By admin | Published: October 4, 2015 02:37 AM2015-10-04T02:37:06+5:302015-10-04T02:37:06+5:30

धार्मिक स्थळांवर कोट्यवधीची उधळण, मात्र देशाचा पोषणकर्ताच आत्महत्येच्या मार्गावर असताना त्याकडे शासन लक्ष देत नाही.

The creator left the wind | पोषणकर्त्याला सोडले वाऱ्यावर

पोषणकर्त्याला सोडले वाऱ्यावर

Next

विद्यार्थ्यांची खंत : शेतकरी आत्महत्येवर रंगली वादविवाद स्पर्धा
गोंदिया : धार्मिक स्थळांवर कोट्यवधीची उधळण, मात्र देशाचा पोषणकर्ताच आत्महत्येच्या मार्गावर असताना त्याकडे शासन लक्ष देत नाही. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस मंजूर केला पण अजूनपर्यंत बोनस मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात येऊन आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला, अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. नमाद महाविद्यालयात शेतकरी आत्महत्या थांबविण्यास शासन अपयशी ठरतेय का? या विषयावर आयोजित वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांनी हा सूर व्यक्त केला.
लोकमत युवा नेक्स्ट, विदर्भ स्टडी सर्कल गोंदिया, राष्ट्रीय सेवा योजना व नमाद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सदर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. देवी सरस्वती व लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उद्घाटन विदर्भ स्टडी सर्कलचे संचालक त्रिलोक शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. रजनी चतुर्वेदी, अतिथी म्हणून जिल्हा विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख व प्रा. बबन मेश्राम उपस्थित होते.
शेतकऱ्यांना पिकासाठी सिंचनाची सोय झाली तर शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबेल, असे उद्गार यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना विदर्भ स्टडी सर्कलचे संचालक त्रिलोक शेंडे यांनी काढले. अध्यक्षीय भाषणात डॉ.रजनी चतुर्वेदी यांनी गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा असून येथील ८५ टक्के शेतकरी वर्षातून एकदाच पीक घेतात. त्यामुळे जनावरांना वैरणाची समस्याही निर्माण होते असे सांगितले.
या स्पर्धेत जिल्हाभरातून नमाद महाविद्यालय, डीबी सायन्स, एस.एस. गर्ल्स महाविद्यालय व इतर ठिकाणातून ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत नमाद महाविद्यालय गोंदियाच्या विद्यार्थिनी शितला मानदाडे प्रथम, आशिष नूतन द्वितीय तर धोटे बंधू विज्ञान महाविद्यालच्या कल्याणी डहारे हिला तृतीय क्रमांक देण्यात आला. प्रोत्साहनपर बक्षीस खेमेंद्र बिसेन याला देण्यात आला.
परीक्षक म्हणून सविता बेदरकर, प्रा. दिप्ती मिश्रा, वैशाली खोब्रागडे यांनी जबाबदारी सांभाळली.
स्पर्धेचे संचालन राखी पटले तर आभार प्रा. बबन मेश्राम यांनी मानले. यावेळी परिक्षकांचा व अतिथींची स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांच्या मार्गदर्शनात दिप्ती भोंगाडे, प्रवीण सुलाखे, गौरव बिसेन, कल्याणी डहारे, हर्षल शेंडे, योगेश दराडे, रोहित रहांगडाले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The creator left the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.