'क्राइम' रेट वाढला ! सहा महिन्यांत १७ खून; ४२ आरोपींच्या हाती बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 04:01 PM2024-08-27T16:01:46+5:302024-08-27T16:16:25+5:30

क्षुल्लक कारणातून घडताहेत मोठे गुन्हे: रेती व भूमाफियांमुळे गुन्हेगारीत वाढ

'Crime' rate increased! 17 murders in six months; 42 shackles in the hands of the accused | 'क्राइम' रेट वाढला ! सहा महिन्यांत १७ खून; ४२ आरोपींच्या हाती बेड्या

'Crime' rate increased! 17 murders in six months; 42 shackles in the hands of the accused

नरेश रहिले 
लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
जिल्ह्यातील अल्पवयीन मुले व तरुणांमध्ये संघटित गुन्हेगारी वाढत आहे. क्षुल्लक कारणातून गंभीर गुन्हे घडत असून, वाढणाऱ्या संघटित गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी पोलिस यंत्रणा काम करीत आहे. परंतु, शालेय वयात असलेल्या मुलांकडे त्यांच्या पालकांचे सतत होणारे दुर्लक्ष त्या बालकांना संघटित गुन्हेगारीकडे ओढून घेत आहे. जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांपैकी फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने वगळता सर्वच महिन्यांत खुनाच्या घटना घडल्या आहेत. यंदा १७ खुनाच्या घटना घडल्या असून, यात ४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 


गोंदियात संघटित गुन्हेगारी डोकावून पाहत आहे. क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली तरी त्या बाचाबाचीतून खून करण्यापर्यंतची मजल शहरातील तरुण मारत आहेत. कायदा कितीही कडक असला आणि कायद्याचे पालन करणारे पोलिस अधिकारी कितीही कर्तव्यदक्ष असले तरी अल्पवयातच मुलांवर योग्य संस्कार होत नसल्यामुळे ती बालके शाळेत जाताच मित्रांच्या नादात गुन्हेगारी जगतात प्रवेश करतात. क्षुल्लक कारणातून खून करण्यापर्यंतची खुन्नस ठेवणे, त्यासाठी संघटित गुन्हेगारी करणे असा फेंड शहरात वाढत आहे. रात्री १ वाजेच्या सुमारास आपल्या घरातील तरुण मुलगा आपल्या घरी नाही, तो कुणाचा तरी खून करायला निघाला आणि त्याला आवर न घालता मोकाट सोडणारे पालक त्याच्या भविष्याची चिंता न करता रात्रीही आपला मुलगा घरी नाही, याची किंचितही चिंता करीत नाहीत. 


पालकांचे मुलांकडे सतत होणारे दुर्लक्ष, केवळ पैसा कमाविण्याचा नाद, जडलेले व्यसन यामुळे पालक मंडळी आपल्या मुलांकडे लक्ष देत नाहीत. परिणामी ती ती वा बालके संघटित गुन्हेगारीकडे वळत आहेत.


गुन्हेगारी जगतात पाय रोवत आहेत विधी संघर्षित बालके 
शहरातील चोया, मारामाऱ्या, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, गैरकायद्याची मंडळी, छेड़खानी या प्रकरणांत अल्पवयीन बालकांचाही समावेश आहे. अशा अनेक बालकांचर शहरासह जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. खेळण्या-बागडण्याच्या वयात गुन्हेगारी जगतात पाय ठेवणे ही बाब समाजासाठी धोक्याची आहे.


प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे 
शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना पाहता प्रेम प्रकरणातून शारीरिक हानीचे गुन्हे शहरात घडत आहेत. रामनगर परिसरात असलेल्या चौपाटी परिसरात दोन हे गुन्हे वर्षांआधी जास्त होते. पाहायला मिळत परंतु, आताही प्रेम प्रकर णातून अल्पवयीन मुले मारामारी, खून किंवा खुनाचा प्रयत्न असे गुन्हे करीत आहेत. आपल्या पाल्यांकडे पालकांचे सतत होणारे दुर्लक्ष त्या पाल्यांना गुन्हेगारी जगताकडे नेत आहे.


मैत्री टिकविण्यासाठी संघटित गुन्हेगारीत पाऊल
सतत मित्रांच्या सान्निध्यात राहणारे तरुण है मनात येईल तसे वागण्याचा प्रयत्न करतात. त्यातच त्यांच्या मनावर काइम सिरिअल पाहून आपले क्राइम जगतात मोठे नाव करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असल्याचे तपासात काही तरुणांकडून लक्षात आले. गोंदिया शहर छोटे असूनही शहरात अल्पवयीन मुले किंवा तरुण शिक्षणाचा नाद सोडून मैत्री टिकविण्यासाठी संघटित गुन्हेगारीकडे वळत आहेत.


गोंदिया जिल्ह्यात महिनानिहाय झालेले खून तसेच अटक आरोपींची संख्या 
                        खुनाची संख्या                  आरोपींची संख्या 

जानेवारी                    ०२                                  ०५    
एप्रिल                        ०३                                  १०
मे                              ०३                                  ०५
जून                           ०६                                  १७
जुलै                           ०१                                  ०१
ऑगस्ट                      ०२                                 ०४


गोंदियातील खून प्रकरणात दोघे विधी संघर्ष बालक आरोपी
शहरातील छोटा गोंदिया परिसरात गुरुवारी (दि. २२) रात्री घडलेल्या विकास उर्फ विक्की श्रीराम फरकुंडे (वय २१) या तरुणाच्या खून प्रकरणात तीन आरोपींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील दोघे विधी संघर्षित बालक आहेत. याशिवाय, खुनाच्या अन्य घटनांमध्येही विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे. शिकण्याच्या वयात ही मुले खून करण्याइतपत धाडस दाखवित असून, ही बाब समाजासाठी नक्कीच गंभीर व मंथन करणारी आहे.

Web Title: 'Crime' rate increased! 17 murders in six months; 42 shackles in the hands of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.