मुंगलीच्या बाजारातील २९ दुकानदारांवर गुन्हे दाखल ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:40+5:302021-04-04T04:29:40+5:30
नवेगावबांध : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून अशात मास्क लावणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले ...
नवेगावबांध : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून अशात मास्क लावणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुंगली येथील बाजारातील २९ दुकानदारांना पोलिसांनी दणका देत गुन्हे दाखल केले आहेत.
कोरोनाचा वाढता उद्रेक बघता मुख्यमंत्र्यांनी मास्कचा नियमित वापर व फिजिकल डिस्टन्सिंग व कोरोनाविषयक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात त्या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र यानंतरही कित्येकांकडून या आदेशाला बगल दिली जात आहे. असाच प्रकार मुंगली येथील बाजारात दिसून आला. बाजारातील कित्येक दुकानदार मास्क न लावताच दिसून आले. विशेष म्हणजे, पोलीस गेल्यानंतर काहींनी मास्क लावले मात्र कित्येकांनी आपल्या कामात व्यस्त राहून पोलिसांनाही बगल दिली. अशात २९ दुकानदारांवर कोरोना प्रतिबंधक नियमानुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी सांगितले.