रब्बी पिकाच्या कापणीसाठी मजुरांचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:50+5:302021-05-25T04:32:50+5:30

उन्हाळी धान पीक कापणीला सर्वत्र सुरुवात झाली असून, साधारणत: या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. ...

Crisis of labor for harvesting rabi crop | रब्बी पिकाच्या कापणीसाठी मजुरांचे संकट

रब्बी पिकाच्या कापणीसाठी मजुरांचे संकट

googlenewsNext

उन्हाळी धान पीक कापणीला सर्वत्र सुरुवात झाली असून, साधारणत: या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. परंतु सध्या कोरोना संक्रमणाचा वाढता ग्राफ ग्रामीण भागात दिसत आहे. त्यामुळे लोक आता एकत्र येऊन काम करण्यासाठी घाबरत आहेत. तर शेतीची कामे एकमेकांच्या सोबत आल्याशिवाय मुळीच करता येत नाही. आता अनेकांची कामे खोळंबलेली दिसत आहेत. नाइलाजाने अनेक शेतकऱ्यांना आपल्या घरच्या लोकांना घेऊन हळूहळू कामे उरकावी लागत आहेत. काही शेतकरी घराबाहेर किंवा धान कापणी व मळणी यंत्राचा सहारा घेत आहेत; परंतु या कामातसुद्धा मजुरांची गरज लागते. त्यासाठीही मजूर मिळत नाही. त्यामुळे मोठा फटका बसत आहे. पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होत असून, खरीप हंगाम सुरू होणार आहे. त्यामध्ये रब्बी पिकांची कापणी, मळणी आणि विक्री करणे आवश्यक आहे. परंतु मजुरांचे संकट असल्याने कामे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

बॉक्स

अवकाळी पाऊस देतोय डबल धक्का

आधीच कोरोनाचा धोका असून, शेतकरी कसातरी आपली रब्बी हंगामाची कामे उरकण्यासाठी धडपडत आहे. परंतु अधून-मधून अवकाळी पाऊस हजेरी लावून त्यात व्यत्यय निर्माण करीत आहे. सोबतच मोठे नुकसानपण होत आहे. आता खरिपाच्या कामांना सुरुवात होणार असल्याने हे सर्व जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत होत आहे.

Web Title: Crisis of labor for harvesting rabi crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.