पीक परिस्थितीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:00 AM2017-08-09T01:00:08+5:302017-08-09T01:02:58+5:30

जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने केवळ ५१ टक्केच रोवणी झाली आहे. त्यामुळे पिकांची स्थिती बिकट असून जमिनीला भेगा पडल्या आहेत.

Crop Scenarios | पीक परिस्थितीची पाहणी

पीक परिस्थितीची पाहणी

Next
ठळक मुद्देपालकमंत्री बडोले : शेतकºयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने केवळ ५१ टक्केच रोवणी झाली आहे. त्यामुळे पिकांची स्थिती बिकट असून जमिनीला भेगा पडल्या आहेत. लावलेली रोपे वाळत चालली आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
त्यांनी ५ व ६ आॅगस्ट रोजी गोरेगाव, सडक-अर्जुनी आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या शेतीला भेट देवून प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथे झनकलाल चौरागडे व मुलचंद भावे या शेतकºयांच्या धान पिकांची पाहणी करून त्यांच्याशी चर्चा केली. चौरागडे हे कृषी विभागाच्या योजनेतून तयार केलेल्या शेततळ्यातून धानाला पाणी देत होते. तर भावे या शेतकºयाने समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पेरणीच केली नसल्याचे सांगितले.
हिरापूर येथील पुष्पा बोपचे यांच्या शेतातील धान नर्सरीची पाहणी केली. कमी पावसामुळे नर्सरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब शेतकºयांनी त्यांना सांगितली. त्यामुळे रोवणी करताना अडचणी येणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले.
या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय अधिकारी तळपाळे, पं.स. सभापती दिलीप चौधरी, उपसभापती बबलू बिसेन, जि.प. सदस्य विश्वजीत डोंगरे, डॉ.लक्ष्मण भगत, पं.स. सदस्य केवलराम बघेले, पुष्पराज जनबंधू, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, संजय बारेवार, माजी सरपंच सतीश रहांगडाले आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी कुºहाडी येथील महा ई-सेवा केंद्राला भेट देवून पीक विमा योजनेच्या आॅनलाईन किती अर्जांची नोंदणी झाली व आॅनलाईन नोंदणी करताना येणाºया अडचणी सेवा केंद्राचे संचालक भुमेश्वर पटले यांच्याकडून जाणून घेतल्या.
सडक-अर्जुनी तालुक्यातील पाटेकुर्रा येथील शेतकरी सकू नेवारे यांच्या शेतात धानिपकांची पाहणी केली. कमी पावसामुळे उत्पादनात मोठा फरक पडणार, असे शेतकºयांनी सांगितले. काही शेतकºयांनी अद्याप रोवणी केली नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणी येतील, असे सांगितले.
पाटेकुर्राचे शेतकरी लेखीराम वरखडे, थाडू राणे यांच्याशी पालकमंत्र्यांनी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी तुमडाम, विजय बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. भुमेश्वर पटले, सरपंच चेतन वडगाये उपस्थित होते.
पळसगाव-डव्वा येथील रूपविलास कुरसुंगे यांच्या पिकांची पाहणी केली. जांभळी येथील काही शेतकºयांच्या पीक परिस्थितीची पाहणी केली.
बाक्टी येथील शेतकºयांशी त्यांनी संवाद साधून चान्ना येथील गजानन महाराज मंदिरात शेतकºयांशी पीक परिस्थितीबाबत चर्चा केली. शेतीला सिंचनासाठी २४ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. भारिनयमनामुळे नुकसान होणार नाही याची काळजी घेणार, असे त्यांनी आश्वासन दिले. बोंडगावदेवी येथे हेमराज बोरकर, यादवराव बरैया, माधव बरैया, सिध्दार्थ साखरे, गणेश वालदे, विनोद वालदे, विजू मानकर, संजय मानकर यांच्या शेतीची पाहणी करून नुकसान झाले तर शासन मोबदला देईल, याची ग्वाही दिली.
शेतकºयांना विम्याचा लाभ मिळेल
खांबी येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात उपस्थित शेतकºयांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. या वेळी पालकमंत्री म्हणाले, पाऊस कमी झाल्यामुळे पीक परिस्थितीची पाहणी करताना केवळ ४५ टक्के पाऊस झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. तलावात केवळ १८ टक्के जलसाठा आहे आणि चार दिवसांत मोठ्या प्रमाणात जिल्ह्याातील शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता भरला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना पीक विमा योजनेचा निश्चित लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले.
‘त्या’ अपघातातील मृत व जखमींना मदत
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील मुंगलीटोला येथील शाळेतील विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी दूध घेवून जाणाºया वाहनाने धडक दिली. या अपघातात कल्याणी कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात जखमी झालेले हर्षा कापगते, योगेश कापगते, रोहिणी डोंगरवार, बादल मेश्राम यांचीही विचारपूस केली. मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. अपघातात मृत्यू पावलेल्या कल्याणी कांबळे या विद्यार्थिनीच्या पालकाला राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेतून तसेच जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आमदार निधीतून मदत करणार असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी विविध कुटुंबांना सांत्वन म्हणून वैयक्तीकरित्या प्रत्येकी १० हजार रूपयांची मदत केली.

Web Title: Crop Scenarios

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.