पर्यटकांच्या गर्दीने फुलले नवेगावबांध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:23 AM2018-01-04T00:23:13+5:302018-01-04T00:23:27+5:30
नववर्षाचे स्वागत आणि विदेशी पक्ष्यांना पाहण्याची संधी असा दुहेरी योग साधत विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर भागातील पर्यटक नवेगावबांध येथे दाखल झाले होते. त्यामुळे नवेगावबांध परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलल्याचे चित्र होते.
रामदास बोरकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : नववर्षाचे स्वागत आणि विदेशी पक्ष्यांना पाहण्याची संधी असा दुहेरी योग साधत विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर भागातील पर्यटक नवेगावबांध येथे दाखल झाले होते. त्यामुळे नवेगावबांध परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे यंदा विदेशी पक्ष्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे.
नवेगावबांध येथे सुमारे ३६० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या तीन हजार एकरावरील जलाशय व सभोवतालच्या टेकड्या व वनाने आच्छादीत परिसरामुळे निसर्गरम्य वातावरणाची अनुभुती येथे अनुभवण्यास मिळते. नवेगावबांध जलाशयामुळे १९७१ ला नवेगावबांध राष्टÑीय उद्यान अस्तित्वात आले. त्यानंतर १९७१ ते १९९० पर्यंत या राष्ट्रीय उद्यानाचे पर्यटक संकुल व त्या काळी अस्तित्वात आलेले प्राणी संग्रहालय, या परिसरातल विविध फुले व बगीच्या पर्यटकांसाठी पर्वनीच ठरत आहे. या परिसराचे सौंदर्य पाहण्याकरिता तिन्ही हंगामात येथे पर्यटकांची गर्दी असते. जून २०१७ ला स्थानिक नागरिकांनी नवेगाव फाऊंडेशनची स्थापना केली. ‘आपला गाव आपलेच सहकार्य व विकास’ ही संकल्पना राबवून मागील ३ महिन्यांच्या अथक परिश्रमातून या संकुल परिसरातील सर्व रस्ते, पदमार्ग, गार्डन सर्वप्रथम (सप्टेंबर २०१७ पासून ) स्वच्छ केले गेले. त्यानंतर हिलटॉप गार्डनमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी व विविध फुलांसह रंगीबेरंगी झाडे लावण्यात आले. पाण्याची व्यवस्था व संपूर्ण बगीचामध्ये सिव्हिल वर्क करुन गार्डनचा चेहरा मोहरा बदलविला. या बगीच्याला पाहण्याकरिता पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यानंतर संपूर्ण पर्यटन संकुल परिसराची स्वच्छता टिकून राहावी, यासाठी ३० कचरा कुड्यांची व्यवस्था फाऊंडेशनने केली.
एवढ्यावरच न थांबता एका नव्या बालोद्यानाची निर्मिती केली. या बालोद्यानाचे वैष्ट्यिे म्हणजे अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत या बालोद्यानाचा आनंद घेवू शकतात, तेही नि:शुल्क. या बालोद्यानात सर्वाधिक गर्दी असते. एकाचवेळी ५० पेक्षा जास्त पर्यटक या बालोद्यानाचा आनंद घेतात.
गेल्या दोन तीन दिवसांपासून नवेगावबांध येथे पर्यटकांची गर्दी वाढय्त असल्याचे चित्र आहे. नवेगावबांध परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता. या परिसरात आणखी सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांच्या संख्येत वाढ होवू शकते.
नौका विहाराचे आकर्षण
नौका विहारासाठी जे.टी. पार्इंटवरील सरोवर दृष्य व नौकाविहार ही पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेले स्थळे आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अविरत नौका विहार सुरुच असते. जलाशयावर येणारे देशी-विदेशी पक्षी पर्यटकांकरिता व पक्षी मित्रांकरिता आकर्षणाचे केंद्र आहे. सकाळी व सायंकाळी या पक्षांना अगदी जवळून पाहण्याची संधी या जलाशयावर उपलब्ध होत असते. त्यातच संकुल परिसराच्या दुसºया टोकावरील संजय कुटी व मालडोंगरी हेही पर्यटकांना आकर्षित करतात. या ठिकाणीही पर्यटकांची गर्दी होते.
चारही दिशेने सर्वच प्रकारच्या साधनाने तेही सुरळीत व खड्डेमुक्त रस्त्यांद्वारे या ठिकाणी पोहोचता येते. प्रशासनाने एकदा या स्थळाचे महत्व लक्षात घेवून या स्थळाचा विकास आराखडा तयार केल्यास हे पर्यटन स्थळ अधिक रोजगार निर्मिती करणारे ठरेल.व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत होईल.
- अध्यक्ष नवेगावबांध फाऊंडेशन
संपूर्ण संकुल परिसराचे एकत्रीकरण करुन ते संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे दिल्यास त्याचे व्यवस्थापन योग्य होईल.
-रामदास बोरकर,
संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवेगावबांध