‘हाजराफॉल’मध्ये वाढू लागली पर्यटकांची गर्दी

By Admin | Published: August 17, 2015 01:36 AM2015-08-17T01:36:24+5:302015-08-17T01:36:24+5:30

प्रसिद्ध हाजराफॉल धबधबा आजघडीला आपल्या सौंदर्याने नटला असून त्याचा आस्वाद घेण्यासाठी येथे पर्यटकांची एकच गर्दी दिसून येत आहे.

The crowd of tourists started growing in Hazraffal | ‘हाजराफॉल’मध्ये वाढू लागली पर्यटकांची गर्दी

‘हाजराफॉल’मध्ये वाढू लागली पर्यटकांची गर्दी

googlenewsNext

सहकुटुंब येणाऱ्यांची संख्या वाढली : समितीची नियंत्रणात्मक देखरेख, मुलांसाठी एडव्हेंचर स्पोर्ट्स
विजय मानकर सालेकसा
मुख्यालयापासून १० किमी. अंतरावर पूर्वेकडे तर जिल्हा मुख्यालयापासून ५२ किमी. अंतरावर असलेला प्रसिद्ध हाजराफॉल धबधबा आजघडीला आपल्या सौंदर्याने नटला असून त्याचा आस्वाद घेण्यासाठी येथे पर्यटकांची एकच गर्दी दिसून येत आहे. दररोजच येथे सहलीची झुंबड दिसून येते.
दरेकसा परिसरातून वाहत असणारे सर्व नदी-नाले एकत्र येऊन त्यांचे पाणी उंच पहाडावरून खाली पडते. धबधब्याचे हे दृश्य मन प्रफुल्लीत करणारे असते. त्यामुळे या ठिकाणी एखाद्या चुंबकीय शक्तीप्रमाणे दूरवरून पर्यटक खेचून येतात. पावसाळा सुरू होताच धनेगाव, कोपालगड व दलदलकुही या तिन्ही नाल्यांचे त्रिवेणी संगम होऊन हाजराफॉलवरील पहाडावर एकाच ठिकाणी पाणी एकत्रित होते व ते पाणी ओव्हर-फ्लो होवून खाली पडते. सुरूवातीला पडणारे पाणी गढूळ व लाल-पिवळ्या रंगाचे असते. परंतु जसजसा गढूळपणा दूर होतो, तसतशी पाण्यात शुभ्रता वाढते आणि हाजराफॉलचे सौंदर्य खुलत जाते.
पूर्वी भागातील सतपुडा पर्वत रांगेच्या कुशीत असलेला हा धबधबा आॅगस्ट महिना व त्यानंतर बघण्यासाठी गेल्यास, मोठ्या हिरव्या-काळ्या गलिच्यावरून कुणी सतत दूध सोडतो की काय? असे वाटते. या धबधब्याचे पाणी खाली पडून एका तलावात जमा होऊन नंतर ते कुआढास नाल्याच्या माध्यमातून वाघनदीला जाऊन मिळते.
हाजराफॉलला कसे पोहोचवावे?
सालेकसा तालुक्यात राज्य महामार्ग क्रं. २४९ दरेकसाजवळ पर्वत रांगेच्या कुशीत असलेला हाजरॉफाल दर्रेकसा रेल्वे स्टेशनपासून पश्चिमेकडे एक किमी. अंतरावर आहे. स्टेशनवरून पायी चालत असताना रेल्वे लाईनवरून गेल्यास या पर्वतातील बोगद्यातून रेल्वेगाडी जाते. त्याची वेगळी अनुभूती प्रत्यक्ष पाहणाऱ्यांना मिळते. तसेच दुसऱ्या बाजूला खुला बोगदासुध्दा आकर्षित करीत असतो. बोगदा पार केल्यावर हाजराफॉल परिसरात पोहचता येते. गोंदियावरून लोकल ट्रेन किंवा बस मार्गाने पोहचता येते. स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने या स्थळापर्यंत सरळ पोहोचता येते.

Web Title: The crowd of tourists started growing in Hazraffal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.