‘अच्छे दिन’च्या घोषणेत फसली जनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:30 AM2018-09-23T00:30:53+5:302018-09-23T00:33:28+5:30
महागाईने देश होरपळून निघत आहे. दररोज पेट्रोेल, डिझेलचे भाव वाढत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमत दिवसेंदिवस कमी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिन आणू शकले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : महागाईने देश होरपळून निघत आहे. दररोज पेट्रोेल, डिझेलचे भाव वाढत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमत दिवसेंदिवस कमी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिन आणू शकले नाहीत. मोदी यांच्या अच्छे दिनच्या घोषणेत जनता मात्र फसल्याची टिका आ.गोपालदास अग्रवाल यांनी केली. अर्जुनी मोरगाव येथे कांग्रेस बूथ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मेळाव्याला अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील सर्व बूथ समन्वयक, कॉंग्रेस पदाधिकारी, महिला कॉंग्रेसचे पदाधिकारी, पं.स.सदस्य, जि.प. सदस्य, सरपंच, उपसरंपच, सदस्य व विद्यार्थी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, राज्यात लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका झाल्यास आपली तयारी असायला पाहिजे. महागाई डायन खाय जात है, या स्मृती ईरानी यांच्या वक्तव्याचा प्रदेश कॉंग्रेस महासचिव उमाकांत अग्नीहोत्री यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपा सरकार खोटे आश्वासने देत असून सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. काळे धन परत आला नाही.
कोणत्याही -शेतकऱ्यांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा झाले नाहीत. शेतकरी कर्जमाफीची योजना फसवी ठरल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटन व बूथ कमेटी यावर मार्गदर्शन करुन मोदी सरकारच्या धोरणावर टिका केली.
या वेळी माजी खासदार नाना पटोले, महाराष्टÑ प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष बबनराव तायवाडे, प्रदेश कॉंग्रेस महासचिव उमाकांत अग्नीहोत्री, डॉ. योगेन्द्र भगत, सी.ए.विनोद जैन, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, तालुका अध्यक्ष भागवत नाकाडे, नामदेव किरसान, झामसिंग बघेले, माजी जि.प.अध्यक्ष के.आर.शेंडे, तालुकाध्यक्ष अध्यक्ष भागवत नाकाडे, माजी जि.प.सभापती राजेश नंदागवळी, माजी जि.प.सदस्य रत्नदीप दहीवले, जिला महिला कॉंग्रेस अध्यक्ष उषा शहारे, जि.प.सदस्य ज्योती वालदे, गिरीष पालीवाल, राजू पालीवाल, जेसाभाई, शेषराव गिरीपुंजे, चेतन शेंडे, इंद्रराज झिलपे, सुभाष देशमुख, अनिल दहीवले, पोर्णिमा शाहारे, नगर पंचायत अध्यक्ष किशोर शहारे,आलोक मोहंती, श्रीकांत गाठबांधे, जयप्रकाश राठोड, प्रमोद लांजेवार, जगदिश मोहबंशी, जगदिश पवार, सरिता कापगते, करुणा नांदगावे, शिला पटले, जिल्हा बँक संचालक रामलाल राऊत उपस्थित होते. संचालन रत्नदीप दहीवले व आभार नरुले यांनी मानले.