महाविद्यालयात निरगुडी वनस्पतींची लागवड ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:58+5:302021-07-10T04:20:58+5:30
आयुर्वेदामध्ये या वनौषधींचे अनेक उपयोग सांगितले आहेत. मुखविकार, गळ्यातील विकार तसेच सर्दी, पडसा यासारख्या अनेक व्याधींवर या वनौषधींचा वापर ...
आयुर्वेदामध्ये या वनौषधींचे अनेक उपयोग सांगितले आहेत. मुखविकार, गळ्यातील विकार तसेच सर्दी, पडसा यासारख्या अनेक व्याधींवर या वनौषधींचा वापर होत असतो. विशेषतः सांधेदुखीवर ग्रामीण भागात या वनस्पतींचा हमखास वापर होत असतो. ग्रामीण भागात ही वनस्पती सहज उपलब्ध होते. झुडपी झाडांचे समूहात या वनस्पतीची नोंद आहे. महाविद्यालय परिसरात या वनस्पतीच्या कलम लागवडीच्या वेळी ग्रंथपाल प्रा. अजय राऊत यांच्यासह मुख्य लिपिक कविता वासनिक, लेखापाल अरुण मुंडले, संजय शेंडे , नितीन सिडाम, बादल लाडे, सुनीता तवाडे, सुधाकर नागपूरे, दिलीप लाडे व गजानन कोल्हे उपस्थित होते. या औषधी कलमांच्या लागवडीच्या प्रसंगी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या घरी, घराजवळील परिसरात या व अशा प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करावी व इतरांना व विद्यार्थ्यांना अशा वनस्पतीच्या लागवडीबाबत प्रोत्साहित करावे असे ग्रंथपाल प्रा. राऊत यांनी सांगितले. कलम लागवड कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राऊत व गजानन कोल्हे यांनी सहकार्य केले.
090721\img-20210709-wa0011.jpg
निरगुडी वनस्पतींच्या कलमांचे रोपण करतांना कर्मचारीवृंद