दुष्काळात पिकविली धानाची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:04 AM2017-11-23T00:04:59+5:302017-11-23T00:05:15+5:30
यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. कमी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हाती आलेले धानपिक गमाविण्याची वेळ आली.
हितेश रहांगडाले।
ऑनलाईन लोकमत
वडेगाव : यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. कमी पावसामुळे बºयाच शेतकºयांना हाती आलेले धानपिक गमाविण्याची वेळ आली. मात्र तिरोडा तालुक्यातील बोरगाव येथील एका शेतकºयांने कमी पाण्यात आणि दुष्काळी परिस्थितीत धानाचे उत्पादन घेतले. त्यांच्या यशस्वी प्रयोगामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आशेचा एक नवा किरण गवसला आहे.
दुष्काळी परिस्थितीत धानपिकाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करणाºया शेतकºयाचे नाव देवानंद रंगनाथ बोपचे (४८) रा. बोरगाव (वडेगाव) असे आहे. त्यांनी त्यांच्या केवळ एक एकर शेतीत अल्प पावसात धानपिकाचे उत्पादन घेऊन इतर शेतकºयांपुढे आदर्श ठेवला आहे. यंदाच्या खरीप हंगामात अर्धा अधिक पावसाळा संपल्यानंतर पुढे पाऊस पडण्याची शक्यता कमीच होती.
आॅगन्ट महिना उलटत असताना सर्वच शेतकºयांची धानाची रोपे (खारी) उन्हामुळे वाळली. अशा विपरित परिस्थितीत बोपचे यांनी त्यांच्या काही शेतकरी मित्रांच्या सल्ल्यानुसार २३ आॅगस्ट रोजी त्याच्या शेतात ट्रॅक्टच्या सहाय्याने रोटावेटर लावून नांगरणी केली.
माती भुसभुसीत झाल्यावर धानाची शेतावर पेरणी करुन आवत्या टाकल्या. त्याने अंतराने पडलेल्या नैसर्गिक पावसाने शेतातील पीक जोमात आले. मजुरांच्या सहाय्याने शेतातील तण काढल्यानंतर धानपिकाची झपाट्याने वाढ झाली. यासाठी त्यांनी कुठलेही रासायनिक खत, औषध व किटकनाशकांचा वापर केला नाही.
शेतात आधीपासूनच टाकलेल्या शेणखताने पीक बहरले. सगळीकडे शेतकरी संकटात असताना देवानंदने एक एकर शेतीत १३ पोती धानाचे उत्पादन घेतले. त्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगाची जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये चांगलीच चर्चा आहे.
शेतकरी मित्रांचा सल्ला पडला उपयोगी
देवानंद बोपचे यांचे काही मित्र जैविक शेती करतात. तसेच ते आवत्या पध्दतीने धानाची लागवड करतात. कमी पावसाचा आवत्या धानावर फारसा परिणाम होत आहे. शिवाय रासायनिक खताऐवजी जैविक खत दिल्याने पिकांची वाढ चांगली होते. शिवाय शेतीच्या लागवड खर्चात सुध्दा बचत करणे शक्य असल्याचा सल्ला देवानंदला दिला. त्यांनी हाच सल्ला आत्मसात करुन यंदा धानाची शेती केली. त्यामुळे त्यांना दुष्काळी परिस्थितीत देखील धानाचे चांगले उत्पादन घेणे शक्य झाले.
शेतकऱ्यांनी शेतीच्या लागवड पध्दतीत बदल केल्यास लागवड खर्चात बचत करण्यास मदत होईल. शेतकºयांनी रासायनिक खतांऐवजी जैविक खतांचा वापर केल्यास उत्पादन वाढविण्यास निश्चित मदत होईल.
- देवानंद बोपचे,
प्रयोगशिल शेतकरी