गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्यातरी महत्त्वाच्या धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2023 01:44 PM2023-06-23T13:44:38+5:302023-06-23T13:47:49+5:30

येणाऱ्या दिवसात जर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नाही तर अनेक ठिकाणी पाणी टंचाईची झळ ही पोचू शकते.

Currently, water storage is available in important dams in Gondia district | गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्यातरी महत्त्वाच्या धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध

गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्यातरी महत्त्वाच्या धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध

googlenewsNext

गोंदिया- गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धरणे , तलावे आहेत. जून महिना संपत आला असला तरी सुद्धा मात्र  जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाका कायम आहे .गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचला आहे आणि मृग नक्षत्र लागून आज 20 ते 25 दिवस लोटे आहेत तरी मात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस पडलं नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील तलाव , धरणे हे अजूनही कोरडे पडले आहेत आणि जर पावसाने येणाऱ्या दिवसात गोंदियामध्ये हजेरी लावली नाही तर जिल्ह्यात पाण्याच्या प्रश्न पेटण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत.

गोंदिया जिल्ह्यात पुजारीटोला धरण ,शिरपूर धरण,कालीसरार धरण , इटीयाडोह धरण आणि धापेवाडा प्रकल्प यासारखे मोठे धरणे आणि प्रकल्प आहेत .या धरणातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र जर सध्याच्या घडीचा विचार केला तर सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणामध्ये 80 टक्के पाणीसाठा आहे. देवरी तालुक्यातील शिरपूर धरणामध्ये शिरपूर धरणामध्ये 8 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कालीसरार धरणामध्ये 34 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह धरणामध्ये 25 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे तर धापेवाडा प्रकल्पात 35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. आणि हा पाणीसाठा सध्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव करून ठेवण्यात आलेला आहे. येणाऱ्या दिवसात जर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नाही तर अनेक ठिकाणी पाणी टंचाईची झळ ही पोचू शकते.

Web Title: Currently, water storage is available in important dams in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.