ग्राहकांनी नेहमी जागरूक असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:29 PM2018-03-17T23:29:34+5:302018-03-17T23:29:34+5:30
ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकाराची माहिती व्हावी यासाठी ग्राहकांनी नेहमी जागरु क असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथारिटी आॅफ इंडियाच्या कर्नाटक, केरळ व महाराष्ट्र क्षेत्राचे प्रमुख श्रीनिवास गलगली यांनी केले.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकाराची माहिती व्हावी यासाठी ग्राहकांनी नेहमी जागरु क असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथारिटी आॅफ इंडियाच्या कर्नाटक, केरळ व महाराष्ट्र क्षेत्राचे प्रमुख श्रीनिवास गलगली यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित दूरध्वनीधारक ग्राहक जागरुकता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी वरिष्ठ संशोधन अधिकारी के. मुरलीधर, व्यवस्थापक प्रशांत मुदलीयार, व्यवस्थापक श्री. भुपेशा, व्यवस्थापक इशांत कुरेकर, प्रसाद हिरुळकर, बीएसएनएलचे व्यवस्थापक विलास बांते, मयंक श्रीवास्तव उपस्थित होते.
गलगली म्हणाले, मोबाईल नंबर पोर्टिबलीटी, अनसॉलिसिटेड कमिर्शयल कम्युनिकेशन, मूल्याधारीत सेवा, तक्रार नोंद कार्यपध्दती व टेरिफ आदींबाबत ग्राहकांनी नेहमी दक्ष राहावे.
कोणत्याही तक्रारी अथवा सेवा, विनंती संदर्भात सेवा घेणाऱ्या व्यक्तीला ग्राहक दक्षता केंद्राशी संपर्क करावा लागतो. त्यानंतर तक्र ार नोंदवली जावून त्या तक्रारीची विस्तारीत माहिती तक्र ार क्र मांक, दिनांक, वेळ, तक्र ार निवारणासाठी लागणारा वेळ ही माहिती एसएमएसद्वारे ग्राहकाला दिली जाते. जर ग्राहक तक्र ार निवारणाबाबत समाधानी नसेल तर तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेवू शकतो. कार्यक्रमाला दूरध्वनी सेवा पुरविणारे अधिकारी, संस्थांचे कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील सदस्य, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, इंजिनियरींग कॉलेज टेलिकाम कम्युनिकेशनचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व दूरध्वनी ग्राहक उपस्थित होते.