रस्त्याच्या कडेची झाडे तोडा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:29 AM2021-01-23T04:29:38+5:302021-01-23T04:29:38+5:30
केशोरी : केशोरी ते वडेगाव बंद्या हा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा मुख्य मार्ग आहे. या मार्गावरून ...
केशोरी : केशोरी ते वडेगाव बंद्या हा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा मुख्य मार्ग आहे. या मार्गावरून अनेक जड वाहतूक होत असते तसेच महामंडळाच्या बससुद्धा धावतात. हा मार्ग अतिशय अरुंद असून त्यातच रस्त्याच्या दोन्ही कडेला अनेक प्रकारची झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपांमुळे अनेकदा लहान-मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेची झाडे तोडण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
वडेगाव बंद्या येथील विद्यार्थी येथे दररोज पायी तसेच सायकलने शाळेत येणे-जाणे करतात. विद्यार्थ्यांचा अनेकदा या रस्त्यावर अपघातसुद्धा झालेला आहे. तसेच या रस्त्यावर मोठमोठे खड्डेसुद्धा पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याची व नवीन रस्ता बनविण्याची अनेकदा मागणी करण्यात आली. परंतु संबंधित विभागाने अजूनपर्यंत या मागणीकडे लक्ष दिले नाही. तसेच या भागातील लोकप्रतिनिधींकडे अनेकदा रस्ता बनविण्याची मागणी केलेली आहे परंतु आश्वासनांशिवाय अजूनपर्यंत काही मिळाले नाही. खड्ड्यांमुळे व रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपांमुळे ब्रह्मपुरीवरून येणाऱ्या बसलासुद्धा मोठी अडचण निर्माण होत आहे. परिणामी बस बंद होण्याच्या या मार्गावर आहे.
ही बस एकदा रस्त्यामुळे बंद आपण झाली होती. पण गावकऱ्यांच्या विनंतीमुळे व विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन ही बस पुन्हा सुरू करण्यात आली. अरुंद रस्ता व रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपामुळे ही बस कधी बंद होईल याची शाश्वती देता येत नाही. तरीपण संबंधित विभागाने रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे तोडण्याची आवर्जून मागणी होत आहे. मागील निवडणुकीत याच समस्यांना घेऊन गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्काराची धमकीसुद्धा दिली होती. परंतु अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेण्यात आला. हे आश्वासन फक्त आश्वासनच राहील काय, अशी शंका गावकऱ्यांच्या मनात येत आहे.