राज्यभरातील सायकल स्पर्धक सालेकसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:17 PM2019-01-13T22:17:20+5:302019-01-13T22:17:48+5:30

महाराष्ट्र राज्यस्तरावरील रोड रेस सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा २०१६-१९ अंतर्गत प्रथमच येथे राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धा घेण्यात येत आली. राज्याच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या एकत्रित सीमेवर राज्यभरातील सायकलींग स्पर्धक पोहोचले आणि येथील मुख्य मार्गावर आपापल्या सायकलींवर धावत असताना पाहताना तालुक्यातील लोकांना एकच नवल वाटले.

In the cyclist competition in the state, | राज्यभरातील सायकल स्पर्धक सालेकसात

राज्यभरातील सायकल स्पर्धक सालेकसात

Next
ठळक मुद्दे१५ जिल्ह्यातील १५० सायकलिस्ट सहभागी : राज्याच्या टोकावर दोन दिवस मेजवानी

विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : महाराष्ट्र राज्यस्तरावरील रोड रेस सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा २०१६-१९ अंतर्गत प्रथमच येथे राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धा घेण्यात येत आली. राज्याच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या एकत्रित सीमेवर राज्यभरातील सायकलींग स्पर्धक पोहोचले आणि येथील मुख्य मार्गावर आपापल्या सायकलींवर धावत असताना पाहताना तालुक्यातील लोकांना एकच नवल वाटले.
सायकलींग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र अंतर्गत दि गोंदिया जिल्हा सायकलींग असोसिएशनच्यावतीने ( आसोली) मुले-मुली तसेच महिला व पुरुष राज्यस्तरीय रोड रेस सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा प्रथमच सालेकसा सारख्या अतिदुर्गम व आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यात ठेवणे म्हणजे अनेक बाबतीत महत्वाचे व धाडसीचे आयोजन होते. तरी सुद्धा आमदार संजय पुराम यांनी दिलेली हिम्मत आणि पाठपुरावा मुळे ही दोन दिवसांची सायकलींग स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
सायकलींग फेडरेशन आॅफ इंडियाच्या अथक प्रयत्नामुळे आपल्या जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविणारे जवळपास १५ जिल्ह्यातील एकूण १५० सायकलीस्ट सहभागी झाले होते. यामध्ये १४ वर्ष, १६ वर्ष, १८ वर्ष, २३ वर्ष आणि खुुल्या गटातील मुले, मुली व पुरुष- महिलांचा समावेश होता.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि.१२) सायंकाळी ५ वाजता येथील आदिवासी गोवारी चौकात जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सविता संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमजार केशव मानकर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सायकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजकुमार कुथे, सायकलींग फेडरेशन आॅफ इंडियाचे कोषाध्यक्ष प्रताप जाधव, राजेंद्र बडोले, नेपाल पटले, विजय मानकर, गणेश भदाडे, विनायक अंजनकर यांच्या उपस्थित होते. दोन दिवसीय स्पर्धेत पहिल्या दिवशी १४ वर्षे वयोगटासाठी १० किमी. सायकलींग, १६ वर्षे वयोगटासाठी १५ किमी. आणि १८ व २३ वर्षे आणि खुल्या गटासाठी २० किमी. सायकलींग अजिंक्य स्पर्धा घेण्यात आली.
दुसऱ्या दिवशी १६ वर्षे व १८ वर्षे वयोगटात मुलींची २० किमी. सायकलींग आणि १८ - २३ वर्षे व खुल्या गटात मुले व पुरुषांची ४० किमी.
सायकलींग स्पर्धा घेण्यात आली. सायकलींग स्पर्धेचे आयोजन सालेकसा-आमगाव दरम्यान राज्य महामार्गावर करण्यात आले असून सायकलींग सोबत त्यांचे सहकारी व आयोजन समितीचे कार्यकर्ते सतत नजर ठेवून होते. त्याचबरोबर ठिकठिकाणी उपचाराची आणि सतत १०८ एंबुलेन्सची सोय होती.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
स्पर्धेदरम्यान सालेकसा ते आमगाव मार्गावर जड वाहनांची ये-जा थांबवून त्यांना दुसऱ्या मार्गावर वळविण्यात आले होते. तर काही वाहनांना रस्त्याच्या एका बाजूला चालविण्याचे सतत निर्देश देण्यात येत होते. मधात येणाºया प्रत्येक गावातील चौक व रस्त्याच्या फाट्यावर चोख बंदोबस्त लावून स्पर्धकांना वाट मोकळी करुन देण्यात येत होती. पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनात सालेकसा तसेच आमगाव पोलीस सुद्धा प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते. पूर्ती पब्लीक स्कूलचे संचालक राजेंद्र बडोले यांच्या सहकार्याने आमदार पुराम यांनी स्पर्धेची मेजवानी स्वीकार केली व स्पर्धकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
दक्षिण महाराष्ट्रातील खेळाडूंचे वर्चस्व
या राज्यस्तरीय रोड रेस सायकलींग स्पर्धेत एकूण १५ जिल्ह्यातील १५० स्पर्धक सहभागी झाले असून यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, पुुणे, जालना, सांगली, नांदेड यासह वर्धा, ठाणे व इतर जिल्ह्यातील सायकलींग स्पर्धकांचे वर्चस्व गाजले.

सायकलींग स्पर्धा ग्रामीण आदिवासी युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून जिल्ह्यातील सालेकसारसारख्या मागासलेल्या तालुक्यात लोकांना खेळाचे महत्व कळेल व त्यांना सुद्धा खेळात भाग घेण्याची आवड निर्माण होईल. या उद्देशातून ही स्पर्धा सालेकसासह जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
-सविता संजय पुराम, माजी सभापती, जिल्हा परिषद गोंदिया

Web Title: In the cyclist competition in the state,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.