स्वच्छतेसाठी सिनेस्टारचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 09:04 PM2018-01-14T21:04:46+5:302018-01-14T21:05:16+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेबाबत शहरवासीयांत जनजागृती करण्यासाठी हिंदी चित्रपट सृष्टीतले स्टार अमिताभ बच्चन व शिल्पा शेट्टी गोंदियात आले आहेत. यासाठी नगर परिषदेने शहरात ठिकठिकाणी होर्डींग्स लावले असून या स्टार्सच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेबाबत शहरवासीयांत जनजागृती करण्यासाठी हिंदी चित्रपट सृष्टीतले स्टार अमिताभ बच्चन व शिल्पा शेट्टी गोंदियात आले आहेत. यासाठी नगर परिषदेने शहरात ठिकठिकाणी होर्डींग्स लावले असून या स्टार्सच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे.
आपले शहर स्वच्छ व सुदर असावे यासाठी शासनाकडून स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. यांतर्गत शासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम घेतले जात असून लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. यासाठी रॅली, पथनाट्य, कार्यक्रम आदिंचे आयोजन केले जात आहे. लोकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जागरूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे होत असतानाच सिनेस्टार्सच्या अदांची कॉपी करणे व त्यांनी काही सांगीतल्यास त्याचे अनुकरण करणारेही त्यांचे कित्येक चाहते आहेत. यासाठीच आता जनजागृतीच्या या कामासाठी सिने व क्रिकेट स्टारचा वापर केला जात आहे. असाच प्रयोग गोंदिया नगर परिषदेने केला आहे. शहरवासीयांत स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी. यासाठी नगर परिषदेच्या स्वछता विभागाने सिनेस्टार अमिताभ बच्चन व शिल्पा शेट्टी तसेच क्रिकेटस्टार सुरेश रैना यांचे होर्डिग्स शहरात ठिकठिकाणी लावले आहेत. या होर्डिंग्सच्या माध्यमातून शहरवासीयांना ओला व सुका कचºयाचे व्यवस्थापन तसेच शौचालय बांधकाम व शौचालयांचा वापर याबाबत संदेश दिला जात आहे. शहरात सध्या हे होर्डिंग्स आकर्षणाचे केंद्र बनले असून प्रत्येकच भागात हे होर्डिंग्स दिसून येत आहेत.
समितीला खुश करण्याचा प्रयत्न
स्वच्छता तसेच शौचालय बांधकाम व त्यांचा वापर करण्याचा संदेश देणारे हे होंर्डिंग्स लावून नगर परिषद आपले काम दाखविण्यासाठी धडपड करीत आहे. विशेष म्हणजे, ९ व १० तारखेला राज्यस्तरीय समिती सर्वेक्षणासाठी आली होती. तेव्हा त्यांना खुश करण्यासाठी स्वच्छता विभागाने हे होर्डिंग्स लावल्याचे आढळले. समिती सर्वेक्षणासाठी येणार असल्याने त्यांना स्वच्छता विभागाकडून किती तत्परतेने काम केले जात आहे हे दाखविण्यासाठी ही सर्व धडपड दिसून आली.