डेली कलेक्शन करणाऱ्याने केली ७२ खातेदारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:11+5:302021-06-05T04:22:11+5:30
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दी भंडारा अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भंडारा येथील एका एजंटने स्वतःच्या फायद्यासाठी ...
गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दी भंडारा अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भंडारा येथील एका एजंटने स्वतःच्या फायद्यासाठी आर्थिक फसवणूक केली. १ जुलै २०१९ ते २३ जुलै २०२० वाजता दरम्यान आरोपीने भंडारा अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भंडारा शाखा, गोंदिया येथे डेली डिपाॅझिट एजंटशिप करीत असताना त्याने १ जुलै २०१९ ते २३ जुलै २०२० पर्यंत ७२ पिग्मी खातेदारांची रक्कम बँकेमध्ये ५ लाख ७१ हजार २६४ रुपये जमा केले आणि पास बुक खात्यावर २२ लाख ४० हजार १६० रुपयांची नोंद केली आहे. १७ लाख ३८ हजार ६४० रुपयाची अफरातफर करून बँकेची व खातेदारांची आर्थिक फसवणूक केली. स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला. बँक व्यवस्थापक अनिल भास्कर झामरे (५३, रा. मामा चौक, गोंदिया) यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४०८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.