सोंड्याटोला प्रकल्पात धरणाचे दरवाजे बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:00 AM2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:32+5:30

सिहोरा परिसरातील शेतीला सिंचनाकरिता वरदान ठरणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातील समस्या आणि अडचणी संदर्भात 'लोकमत'ने सातत्याने वृत्त प्रकाशित केले आहे. परंतु नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेमार्फत या समस्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चांदपूर जलाशयात पाणी उपलब्ध नसताना राजकीय पुढारी आंदोलनाची भूमिका घेण्याचे प्रयत्नात असले तरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाचे शेजारी मातीचे ढिग आणि झुडपी वाढली आहे.

The dam gates at the Sondyatola project will be closed | सोंड्याटोला प्रकल्पात धरणाचे दरवाजे बंद होणार

सोंड्याटोला प्रकल्पात धरणाचे दरवाजे बंद होणार

Next
ठळक मुद्देबावनथडी नदीचे पात्र आटले : नदीपात्रातून पाण्याचा उपसा बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात यंत्रणेच्या निष्क्रीयतेमुळे नदी पात्रातील गाळ आणि माती स्वच्छ करण्याचे प्रयत्न करण्यात आले नाही. यामुळे पंपगृहाला नदी पात्रातील पाणी पुरवठा बंद झाला आहे. सध्या धरणाचे दरवाजे बंद करण्याची प्रक्रिया रविवारपासून सुरु करण्यात आली आहे.
सिहोरा परिसरातील शेतीला सिंचनाकरिता वरदान ठरणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातील समस्या आणि अडचणी संदर्भात 'लोकमत'ने सातत्याने वृत्त प्रकाशित केले आहे. परंतु नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेमार्फत या समस्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चांदपूर जलाशयात पाणी उपलब्ध नसताना राजकीय पुढारी आंदोलनाची भूमिका घेण्याचे प्रयत्नात असले तरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाचे शेजारी मातीचे ढिग आणि झुडपी वाढली आहे. धरण स्वच्छ करण्यासाठी कधी आंदोलन उभारण्यात आले नाही. यंत्रणेवर दबाव निर्माण करण्यात आले नाही. पंपगृहाचे अगदी तोंडावर झुडप वाढली असल्याने नदीपात्रात पाण्याचा प्रवाह सम (टाकी)च्या दिशेने सुरळीत सुरु राहत नाही. प्रकल्प स्थळात टाकीचे लगत असणारे नदीचे पात्रातील गाळ उपसा करण्याची ओरड असताना यंत्रणेमार्फत लक्ष देण्यात आले नाही.
प्रकल्प स्थळात यंत्रणेमार्फत समस्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. नदीपात्रातून पाणी वाहत असताना उशिरा पंपगृह सुरु करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. बावनथडी नदीचे पात्र बारमाही वाहणारे नाही. अशी माहिती यंत्रणेला असताना पाणी उपसा करण्याचे निर्णय जलद गतीने घेण्यात आलेला नाही. उशिरा दोन पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला असता अवघ्या दोन दिवसात उपसा बंद करण्यात आलेला आहे. नदीपात्रात अल्प जलसाठा असून टाकीमध्ये पात्रातील पाणी पोहचत नसल्याने नवे संकट निर्माण झाले आहे.
पावसाअभावी रोवणी खोळंबली आहे. चांदपूर जलाशय मदतीकरिता धावून जाण्याचे अपेक्षित नाही. यामुळे यंदा खरीप हंगामातील रोवणीवरून शेतकरी चिंताग्रस्त झाली आहेत. महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प असताना सुद्धा शेतकरी नागवला जात आहे. एरवी वर्षातील नऊ महिने कधी यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी प्रकल्प स्थळात परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता फिरत नाही.
चार पंपगृह दुरुस्त असताना निविदा कंत्राटदारावर कारवाई केली जात नाही. प्रकल्प स्थळातील समस्या संदर्भात वाच्यता केल्यास वरिष्ठ अधिकारी कार्यरत कर्मचाऱ्यांना खडसावत आहेत. सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात ठिकठाक चित्र नसताना जबाबदार वरिष्ठ अधिकारी व निविदा कंत्राटदार पळवाट शोधत अहेत. बावनथडी नदीपात्रात पाण्याचे स्त्रोत नाहीत.
पावसाचे पाण्यावर पात्र अवलंबून आहे. पावसाने दडी मारताच उपसा बंद करण्यात आला आहे. नदीचे पात्र आटण्याचे मार्गावर आल्यानंतर प्रकल्पाला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाचे दरवाजे बंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दरम्यान धरण शेजारील गाळ उपसा करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावण्याची मागणी आहे.

बावनथडी नदीपात्रात स्त्रोत नाहीत. यामुळे सोंड्याटोला प्रकल्पात उपसा करताना पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने तत्कालिन आमदारांनी वैनगंगा नदीवर बपेरा चांदपूर स्थानांतरीत योजनेचा प्रस्ताव तयार केला होता. या योजनेमुळे बारमाही सिंचनाची सोय होणार असल्याने अंमलबजावणी झाली पाहिजे.
-किशोर राहांगडाले, सामाजिक कार्यकर्ते, बिनाखी

Web Title: The dam gates at the Sondyatola project will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण