कीडरोगांमुळे ४९ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:11 PM2017-11-20T22:11:47+5:302017-11-20T22:12:37+5:30
यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने ७० हजारांवर हेक्टर क्षेत्र पडीक राहिले.
देवानंद शहारे।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने ७० हजारांवर हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. तर काही शेतकऱ्यांनी कशी बशी रोवणी केली, पण धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. यामुळे जिल्ह्यातील ४९ हजार हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सोमवारी (दि.२०) जिल्हाधिकाºयांना पाठविला आहे.
यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे अनेकांची रोवणी होवू शकली नाही. काही शेतकऱ्यांचे पºहेसुद्धा करपले. नुकसानीत भरीस भर म्हणून कीडरोगांनी पिकांवर आक्रमण केले. धान पिकांवरील तुडतुड्यांमुळे बाधित क्षेत्राचे जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले. यात ४८ हजार ९६९.५३ हेक्टरातील धानपीक प्रभावित झाल्याचे आढळले. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात १ लाख ७८ हजार २२९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र पेरणीखाली आहे. पावसाच्या अभावाने यावर्षी केवळ १ लाख ४३१०२ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अहवालात नमूद आहे. त्यातच ४८ हजार ९६९.५३ हेक्टरमधील पीक तुडतुड्यामुळे बाधित झाले आहे. केवळ ९४१३२.६७ हेक्टरमधील पीक तुडतुड्याच्या प्रादुर्भाव नसल्याचे कृषी विभागाचे म्हटले आहे.
पावसाचा अभाव, रोवणी न होणे, पºहे करपणे, त्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नच होणार नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतातील उभे पीक जाळून टाकल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात तुडतुड्यामुळे ३३ टक्केपेक्षा कमी प्रादुर्भावाचे क्षेत्र २४ हजार २१०.६६ हेक्टर आहे. तर ३३ टक्केपेक्षा जास्त प्रादुर्भावाचे क्षेत्र २४ हजार ७५८.८७ हेक्टर आहे. असे ४८ हजार ९६९.५३ हेक्टर क्षेत्र तुडतुड्यामुळे बाधित झाले आहे. त्यातही देवरी, गोंदिया व तिरोडा तालुक्यातील धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.