तुडतुडा व किड्यांच्या उपद्रवाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:10 PM2017-10-29T22:10:32+5:302017-10-29T22:10:50+5:30

तालुक्यातील महागाव परिसरात हाती आलेल्या धानपिकांवर तुडतुडा, पानकिडा व रोगांच्या उपद्रवाने धानाचे पीक नेस्तनाबूत झाले आहे.

Damage to crops due to thunder and insects | तुडतुडा व किड्यांच्या उपद्रवाने पिकांचे नुकसान

तुडतुडा व किड्यांच्या उपद्रवाने पिकांचे नुकसान

Next
ठळक मुद्देशेतकरी हतबल : नुकसान भरपाई देण्याची शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : तालुक्यातील महागाव परिसरात हाती आलेल्या धानपिकांवर तुडतुडा, पानकिडा व रोगांच्या उपद्रवाने धानाचे पीक नेस्तनाबूत झाले आहे. घरामध्ये येणारे पीक रोग व वादळी पावसाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाल्याने शेतकºयांच्या नशिबी पुन्हा कर्जबाजारीपणाचा शाप आला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी शेतकरी बांधवाकडून मागणी होत आहे.
यावर्षी शेतीच्या हंगामाने सुरुवातीपासून शेतकºयांना मेटाकुटीस आणून सोडले. प्रारंभी पावसाने दगा दिला असता पाण्याची जमवा-जमवा करुन धानाची रोवणी करण्यात आली. महागडी बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करताना शेतकºयांची मोठी दमछाक होते. कर्जाच्या ओझ्यात वावरणारा बळीराजा सुखाची झोप घेतच नाही. शेती हाच एकमेव पर्याय असल्याने हंगाम पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. अनेक प्रसंग अडचणीवर मात करुन शेतामध्ये धानाची रोपे मोठ्या दिमाखाने उभी केली.
दिवस-रात्र राब-राब करुन धानाचे पीक सुस्थितीत आले. येत्या काही दिवसांत धानाचे पीक घरामध्ये येणार व आपले दारिद्र्य काही प्रमाणात दूर होणार असे स्वप्न पाहणारा बळीराजा निसर्गाच्या अस्मानी संकटांनी मात्र जाम खचून गेला. महागाव परिसरात तुडतुडा, पानकिडा रोगामुळे पीक पूर्णत: नेस्तनाबूत झाले. निसर्गाची अवकृपा एकाएकी आलेल्या वादळी पावसाने कापनीस आलेल्या धानाची सरसकट राखरांगोळी झाली. मोठ्या आशेने असणारा शेतकरी आता चिंतामय झाला आहे. महसूल व कृषी विभागाचे कृषी सहाय्यक बोरकर यांनी शेतामध्ये जावून पिकांची पाहणी केली. शेतकºयांना वेळीच मदत करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Damage to crops due to thunder and insects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.