वादळी पावसाने धानपिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 09:54 PM2017-10-23T21:54:21+5:302017-10-23T21:55:00+5:30
जिल्ह्यातील काही भागात शनिवारी (दि.२१) रात्रीच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे ८०० हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील काही भागात शनिवारी (दि.२१) रात्रीच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे ८०० हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले आहे. वादळी पावसाने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ओरड जिल्ह्यातील शेतकºयांची आहे. त्यामुळे नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शनिवारी (दि.२१) रात्रीच्या सुमारास वादळी वाºयासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेकडो हेक्टरमधील धान अक्षरक्ष: झोपल्या गेले. रात्रभर धानाची लोंब पाण्यात राहिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात दरवर्षी १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने ७० हजार हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. त्यामुळे उर्वरित १ लाख १५ हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यंदा कमी पाऊस झाल्यानंतरही शेतकºयांनी कशी बशी धानाची रोवणी करुन पिके जगविण्याचा प्रयत्न केला. महिनाभरानंतर धान कापणीला येणार असतानाच त्याला वादळी पावसाचा फटका बसल्याने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला. कमी पाऊस झाला असतानाही शेतकºयांनी रक्ताचे पाणी करुन पिके वाचविली. मात्र त्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. पावसाअभावी आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकºयांना अस्मानी संकटाचा फटका सहन करावा लागला. वादळी पावसामुळे सर्वाधिक पिकांचे नुकसान अर्जुनी-मोरगाव तालुक्यात झाले. या तालुक्यातील ६३७ हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मात्र उर्वरित तालुक्यात सुध्दा वादळी पावसामुळे धानपिकांचे नुकसान झाले असून ८०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान शेतकºयांची ओरड वाढल्यानंतर कृषी विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले. पालकमंत्री बडोले यांनी देखील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही शेतांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.
नुकसान भरपाईची मागणी
वादळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे कृषी विभागाने नुकसानीचे योग्य सर्वेक्षण करुन आर्थिक मोबदला देण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
कीडरोगांचा प्रादुर्भाव
उष्ण दमट वातारणामुळे धानपिकांवर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी हजारो हेक्टरमधील धानपिक धोक्यात आले आहे. कीडरोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करुन फवारणी करित आहेत. मात्र यानंतरही कीडरोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हैराण असल्याचे चित्र आहे.