नृत्य स्पर्धेत सखींचा ‘झिंग झिंग झिंगाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2017 12:28 AM2017-03-16T00:28:09+5:302017-03-16T00:28:09+5:30
लोकमत सखी मंचच्या तिरोडा शाखेच्या वतीने महिला दिनानिमित्त १० मार्च रोजी गजानन मंदिर सभागृह येथे ....
विविध स्पर्धा : सत्कार व सांस्कृतिक कार्यक्र मांनी केले मनोरंजन
तिरोडा : लोकमत सखी मंचच्या तिरोडा शाखेच्या वतीने महिला दिनानिमित्त १० मार्च रोजी गजानन मंदिर सभागृह येथे कर्तुत्ववान सखींचा सत्कार, सखीं मंच प्रतिनिधींचा सत्कार व विविध सांस्कृतिक कार्यक्र म तसेच एकल व कपल नृत्य स्पर्धा, ऐतिहासिक महिला वेशभूषा स्पर्धा, असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमात सर्व सखींसह अतिथीसुद्धा झिंग झिंग झिंगाट करत थिरकले.
या वेळी कर्तुत्ववान सखी म्हणून नविनर्वाचित नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, नगरसेविका राखी गुनेरिया व ममता हट्टेवार यांचा संयोजिका ममता दुबे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंचावर माजी संयोजिका, सर्व प्रतिनिधी, स्पर्धेचे परीक्षक डॉ. प्रिया ताजने, डॉ पूनम चव्हाण, संगीता अग्रवाल उपस्थित होते.
प्रास्ताविक मांडताना संयोजिका ममता दुबे यांनी, सखी मंच हे महिला एकतेचे प्रतिक असल्याचे सांगितले. राखी गुणेरीया यांनी महिलांचा विकास व सशक्तीकरण यावर विचार मांडले. ममता हट्टेवार यांनी महिला ही विविध गुणांचा एक पुंज असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात सोनाली देशपांडे यांनी महिलांना साहसी व स्वावलंबी होण्याचा सल्ला देत सखी मंच हे शहरातील महिलांचे सर्वोत्कृष्ट संघठन असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सदस्य अभियानात सहकार्य करणाऱ्या प्रतिनिधी सुनंदा भांडारकर, रूबीना मोतीवाला, मीनाक्षी जांभुळकर ,छाया मडावी, राजश्री पालांदुरकर, ममता असाटी, नीता पोद्दार, आशा कटरे, दीप्ती शाहारे ,सुवर्णा पालांदुरकर, रितू गुनेरिया, वनीता ठाकरे, हेमलता रहांगडाले, अनिता जैन, निर्मला सरोते ,मीनाक्षी ठाकरे ,दर्शना राखडे यांचा स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्र मात उपस्थित सर्व सदस्यांचा लकी ड्रॉ काढून एस. बी. गिफ्ट कॉर्नरच्या वतीने निवडलेल्या दोन सदस्यांना भेटवस्तू पारितोषिक स्वरूपात देण्यात आले. यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ऐतिहासिक महिला वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम मनिता अग्रवाल, द्वितीय मानसी खंडाते, तृतीय लता गेडाम आणि प्रोत्साहन पारितोषिक प्रीती शेंडे यांना देण्यात आले. स्पर्धेत हेमलता रहांगडाले, वनिता ठाकरे, सुनंदा भांडारकर, सुनिता कोट्टीवार, तेजेस्वरी बावणथडे, मीनाक्षी जांभुळकर, ममता असाटी, डॉ.अर्चना गहेरवार, नीलम चव्हाण व रूपाली भोयर यांनी भाग घेतला.
एकल नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम रितू गुनेरिया, द्वितीय शीतल राऊत व तृतीय नीलम चव्हाण आणि प्रोत्साहन पारितोषिक मनीता अग्रवाल यांना देण्यात आले. स्पर्धेत सोनाली सोंनकावले, नीता हिरापुरे, मानसी खंडाते, रीमा अग्रवाल, लीना कुर्वे, प्रीती बर्वे, पौर्णिमा गेडाम यांनी सहभाग घेतला. कपल नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम डॉ. अर्चना गहेरवार आणि नीलम चव्हाण, द्वितीय अदिती उगवकर आणि श्वेता शेडके, तृतीय राणी बालकोठे व प्रीती पुडके यांना देण्यात आले. स्पर्धेत सोनाली सोनकावळे, राणी बालकोठे, प्रीती पुडके यांनी सहभाग घेतला.
संचालन छाया मडावी, रेणुका खांबरे व माया तिडके यांनी केले. उत्कृष्ट संचालन केल्याबद्दल त्यांचा भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. संयोजिका ममता दुबे यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी प्रिया बुलचन्दानी, पूनम शर्मा, स्वाती राणे, जया खरवडे, ज्ञानेश्वरी वासनिक यांनी सहकार्य केले. उपस्थित सर्व सखी व अतिथींच्या सामूहिक नृत्याने झिंग झिंग झिंगाट करीत कार्यक्र मची सांगता करण्यात आली. (प्रतिनिधी)