विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 12:56 AM2017-08-13T00:56:32+5:302017-08-13T00:57:24+5:30
येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. ही केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. ही केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या जीर्ण इमारतीत बसून शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आल्याचे चित्र आहे.
मागील पाच वर्षांपासून ही इमारत दुरूस्त करण्यात आलेली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून इमारत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन इमारत बांधकामाची मागणी पालक व नागरिकांनी केली आहे.
सध्या पावसाळा सुरू असून जीर्ण इमारती या कालावधीत कोसळतात. येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत देखील जीर्ण झाली असल्याने शाळेच्या परिसरात वावरणाºया विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. सौंदड येथील जिल्हा परिषदेची इमारत मागील पाच वर्षांपासून जीर्णावस्थेत आहे. काही वर्षापूर्वी दोन वर्गखोल्यांचे नविनीकरण करण्यात आले होते. पैसा बचाव कार्यक्रम असल्याने सदर दोन्ही वर्गखोल्या सध्या भंगारावस्थेत आहेत. पाऊस आल्यास या वर्गखोल्या गळत असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना दुसरीकडे बसवावे लागते. सदर दोन्ही वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्याची मागणी मुख्याध्यापक ई.के. मडावी व शाळा समितीने केली आहे. याशिवाय प्रयोगशाळेची जीर्ण झालेली इमारत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पाडून त्या ठिकाणी नविन इमारत बांधण्याची मागणी आहे. त्यामुळे भविष्यात होणारे अपघात टळू शकतील. येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये एकूण पाचवी ते दहावीपर्यंत एकूण ३३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याच शाळेजवळ एक दुसरी जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा असून पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. ती इमारतसुद्धा जीर्ण झाली आहे.
मागील अनेक वर्षांपासून सदर इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी आताच उपाय योजना करण्याची गरज आहे.
- रमेश चुºहे
जि.प.सदस्य, गोंदिया