अवैध दारू विके्रत्यांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 08:40 PM2017-11-06T20:40:44+5:302017-11-06T20:40:57+5:30

गोंदिया जिल्हा पोलिसांनी रविवारी धाडसत्र राबवून अवैध दारू विक्रेत्यांना चांगलाच दणका दिला आहे.

Dangers to illegal liquor vendors | अवैध दारू विके्रत्यांना दणका

अवैध दारू विके्रत्यांना दणका

Next
ठळक मुद्देपोलिसांचे धाडसत्र : २८ विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलिसांनी रविवारी धाडसत्र राबवून अवैध दारू विक्रेत्यांना चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत पोलिसांनी २८अवैध दारु विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे.
यांतर्गत अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी माहुरकुडा येथील श्रीराम नारायण गोटीपरतीवार (५५) याच्याकडून देशी दारुचे १० पव्वे, केशोरी पोलिसांनी राजोली येथील भोजराज पंढरी टेंभुर्णे याच्याकडून देशी दारुचे ४ पव्वे, तिरोडा पोलिसांनी विहिरगाव येथील सुमित्रा श्रीपत पाटील (६३) हिच्याकडून हातभट्टीची १० लिटर दारु, बेलाटी खुर्द येथील राजेंद्र उर्फ भुºया मोडकू तुमसरे (३५) याच्याकडून १२ लिटर हातभट्टीची दारु, रावणघाटा येथील वसंता रघु शहारे (४३) याच्याकडून हातभटटीची १८ लिटर दारु, सोनेखारी येथील शालीक कैलास सयाम (५५), ज्ञानेश्वर शकर वलके (२८), राजेश्वर भोला पारधी (३८), नवेझरी येथील वसंता सोमा वाढीवे (५१) व किसनपूर येथील शोभाराम वलके (४०) याच्या जवळून हातभट्टीची २० लिटर दारु, १६० किलो मोहफुल व दारु गाळण्याचे साहित्य असा एकूण ५ हजारांचा माल जप्त केला.
चिचगड पोलिसांनी जावेद सलीम शेख याच्याकडून देशी दारुचे ८ पव्वे, रामनगर पोलिसांनी हिवरा येथील झनकलाल नोकलाल माहुले (६३) याच्याकडून देशी दारुचे ५ पव्वे, शहर पोलिसांनी गौतम नगरातील उर्मिला विनोद लांजेवार (७६) हिच्याकडून हातभट्टीची ५ लिटर दारु, छोटा गोंदिया येथील गुजोबा वैद्य याच्याकडून हातभट्टीची ७ लिटर दारु, ज्योती अजय राहुलकर (४२) हिच्याकडून हातभट्टीची ५ लिटर दारु, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया शहारवाणी येथील गुणीलाल श्रीराम पुराम (४२) याच्याकडून हातभट्टीची ५ लिटर दारु, योगेंद्र उर्फ नान्हु पालेवार (५०) याच्याकडून हातभट्टीची ३ लिटर दारू, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया खिडकीटोला येथील मीना मगरु कुसराम (३०) याच्याकडून हातभट्टीची ५ लिटर दारु, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया आमगाव खुर्द येथील अशोक तुळशीराम अंबादे (५४) याच्याकडून देशी दारुचे ५ पव्वे, गोरेगाव पोलिसांनी बागडबंद येथील मंसाराम जग्गू मेश्राम (४५) याच्याकडून हातभट्टीची ६ लिटर दारु, गिधाडी येथील महागीलाल मन्साराम शेंडे (५०) याच्याकडून देशी दारुचे ५ पव्वे, दवनीवाडा पोलिसांनी नवेगाव येथील राजु चिमनलाल गजभिये (२७) याच्याकडून देशी दारुचे २४ पव्वे, गोंदिया ग्रामीण पोलिसांनी कारंजा येथील अरुण जणू मेश्राम (४२) याच्याकडून हातभट्टीची २० लिटर दारु, पांढराबोडी येथील राजु धनिराम उईके (२९) याच्याकडून हातभट्टीची ६ लिटर दारु, चांदणीटोला येथील सुशीला झनकलाल मस्करे (४०) हिच्याकडून देशी दारुचे ३ पव्वे, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया सडक-अर्जुनी येथील गीता गंगाराम मेघराज (६०) हिच्याकडून देशी दारुचे ४ पव्वे तर नवेगावबांधच्या इंदिरानगरातील ईश्वर नारायण नलगोपलवार (३९) याच्याकडून देशी दारुचे १२ पव्वे जप्त करण्यात आले. सदर आरोपीवर मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Dangers to illegal liquor vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.