दरेकसा दलमने घातपात केल्याचा संशय; तीन राज्यांची संयुक्त नक्षल शोध मोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 10:52 AM2023-02-22T10:52:22+5:302023-02-22T10:53:44+5:30

शहीद जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Darekasa Dalam suspected of assassination; Joint Naxal search operation of three states started | दरेकसा दलमने घातपात केल्याचा संशय; तीन राज्यांची संयुक्त नक्षल शोध मोहीम सुरू

दरेकसा दलमने घातपात केल्याचा संशय; तीन राज्यांची संयुक्त नक्षल शोध मोहीम सुरू

googlenewsNext

गोंदिया : छत्तीसगड राज्यातील चांदसुरज चौकी नजीक नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार करून दोन पोलिसांना ठार केले. हा घातपात दरेकसा दलम व प्लाटून-१ यांनी घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परंतु गोळीबार करणारे एकही नक्षलवादी पोलिसांना मिळाले नाही. त्या नक्षलवाद्यांची शोध मोहीम महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्यप्रदेश या तीन राज्यांतील पोलिस करीत आहेत.

महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील सालेकसा (सशस्त्र दूरक्षेत्र दर्रेकसा) हद्दीतील चांदसुरज ते बोरतलाव (जि. राजनांदगाव, छत्तीसगड) मेन रोडवरील आंतरराज्यीय चेकपोस्ट जवळ सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पोलिस ठाणे बोरतलाव येथे तैनात असलेले पोलिस हवालदार राजेश श्रीहरीप्रसाद सिंह (६१, बक्कल नंबर २९२, रा. डोंगरगड) व पोलिस शिपाई ललित बुधराम यादव, (३०, बक्कल नंबर ५३२, रा. बडेतुमनार, बाजारपारा, पोलिस ठाणे गिदम, जि. दंतेवाडा) (मूळ नेमणूक-एफ कंपनी, कॅम्प मौहाढार, पोलिस ठाणे गातापार जि. खैरागड- छुईखदान- गंडई, २१ वी बटालियन (भा/र) छत्तीसगड सशस्त्र बल, करकाभाट, जि. बालोद) हे पोलिस ठाणे बोरतलाव येथून तपासणीसाठी चेकपोस्टकडे मोटारसायकलने जात असताना चेकपोस्ट जवळ दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. यात दोघे पोलिस शहीद झाले. नक्षलवाद्यांनी शहीद पोलिसांकडील मोटारसायकलला जाळले. या घटनेसंदर्भात पोलिस ठाणे बोरतलाव (जि. राजनांदगाव) येथे अपराध क्रमांक ०३/२०२३, भादंविच्या कलम १४७, १४८, १४९, ३०२, ४२७, सहकलम ३८ (१) (२), ३९ (२) यु.ए.पी. ॲक्ट, सहकलम २५, २७ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळगावी अंत्यसंस्कार

नक्षलवाद्यांच्या गोळीबारात शहीद झालेल्या दोन पोलिसांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आले. त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. घटना घडल्यानंतर राजनांदगाव येथे आईजीपी डॉ. आनंद छाबडा, डीआईजी आईटीबीपी ओ. पी. यादव, वरिष्ठ पोलिस अधीक्षक अभिषेक मीणा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक लखन पटले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पद्मश्री तवर, पीटीएस एसपी गजेंद्र सिंह, टूआईसी आईटीबीपी जावेद अली, नगर पुलिस अधीक्षक अमित पटेल, एसडीओपी डोंगरगड प्रभात पटेल, डीएसपी ऑप्स अजीत ओग्रे, डीएसपी नेहा वर्मा, रक्षित निरीक्षक भूपेंद्र गुप्ता, महापौर हेमा देशमुख उपस्थित होते.

Web Title: Darekasa Dalam suspected of assassination; Joint Naxal search operation of three states started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.