पथदिव्यांची वीज कापल्याने शेंडावासीय अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:19+5:302021-06-25T04:21:19+5:30
सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून ही गावे जंगल परिसरात येतात. त्यामुळे वन्यप्राणी व जमिनीवर सरपटणाऱ्या विंचू, साप यासारख्या विषारी ...
सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून ही गावे जंगल परिसरात येतात. त्यामुळे वन्यप्राणी व जमिनीवर सरपटणाऱ्या विंचू, साप यासारख्या विषारी जीवजंतूंची संख्या अधिक प्रमाणात असते. सर्वत्र काळोख होत असल्याने चोरांना रान मोकळे झाले आहे. त्याचप्रमाणे शेतकरीसुद्धा शेतीविषयक कामांसाठी वेळोवेळी शेतशिवारात जातात, अशा वेळी कळत नकळत जीवितास धोका होण्याची भीती नाकारता येत नाही. हा परिसर आदिवासी बहुल नक्षल क्षेत्रात मोडतो. त्यामुळे चोवीस तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचा शासनाचा मानस आहे. पथदिव्यांचे वीजबिल भरणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी गावकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही. पथदिवे बंद असल्यामुळे कोणत्याही अत्यावश्यक कामासाठी रात्री घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तरी पथदिवे पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
कोट.....
पथदिव्यांचे वीजबिल भरणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे. गावातील पथदिव्यांच्या मेंटेनन्सचे काम ग्रामपंचायतचे आहे व ते कराच्या माध्यमातून केले जाते.
-मोहनलाल बोरकर, सरपंच, ग्रा.पं. शेंडा
कोट.....
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पथदिव्यांच्या बिलाची रक्कम भरण्याचे आदेश असतानासुद्धा जिल्हा परिषदेने वीजबिल भरले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांचे वीज कनेक्शन कापण्यात आले.
- एच.के. टेंभुर्णीकर, कनिष्ठ अभियंता, वीज वितरण, देवरी