विवाह संस्कार सोहळ्यातून दिला बेटी बचावचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:33 PM2019-05-13T22:33:10+5:302019-05-13T22:34:03+5:30
येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक कुलदीप लांजेवार या तरूणाने आपल्या विवाह संस्कार सोहळ्यातून सामाजिक बांधिलकीचा कार्य म्हणून बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच स्वच्छ भारतचा संदेश दिला.आजच्या आधुनिक काळात संत महापुरुषांच्या विचारांचा आदर्श ठेऊन हा विवाह संस्कार सोहळा साजरा करण्यात आला. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची परिसरात चर्चा होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक कुलदीप लांजेवार या तरूणाने आपल्या विवाह संस्कार सोहळ्यातून सामाजिक बांधिलकीचा कार्य म्हणून बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच स्वच्छ भारतचा संदेश दिला.आजच्या आधुनिक काळात संत महापुरुषांच्या विचारांचा आदर्श ठेऊन हा विवाह संस्कार सोहळा साजरा करण्यात आला. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची परिसरात चर्चा होत आहे.
राष्टÑसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने या विवाह संस्कार सोहळ्याला सुरूवात करण्यात आली. या वेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा आश्रम मोझरी, जि. अमरावती येथील प्रबोधनकार हभप. लक्ष्मणदास काळे महाराज, राष्टÑसंत विचाराचे ज्येष्ठ अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, राष्टÑीय युवा कीर्तनकार प्रशांत ठाकरे, विजय वाहीकर उपस्थित होते.
यावेळी श्री गुरुदेव पद्धतीने देशभक्ती, समाजपयोगी मंगलाष्टकांनी विवाह संस्काराची सुरुवात झाली. सोबतच शुभाशिर्वाद देण्यासाठी आलेल्या वºहाड्यांना व राष्टÑसंतानी रचलेल्या सामुदायिक ध्यान व प्रार्थनेची पुस्तक नवदांपत्याकडून देण्यात आली. विवाह संस्कार सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांचे बेटी बचाओ बेटी पढाओ व सप्तपदी स्वच्छतेची चा संदेश देणारे बॅचेस लाऊन एका अनोख्या स्वरुपात स्वागत करण्यात आले. विवाह संस्कार सोहळ्याच्या आयोजनात कुठलाही व्यर्थ खर्च न करता कमी खर्चात आदर्श विवाह संस्कार कसा संपन्न होऊ शकतो याचा संदेश देण्यात आला.
विवाह संस्कार सोहळ्याचे महत्त्व मान्यवरांकडून मार्गदर्शन करीत अशा विवाह संस्कार सोहळ्याच्या आवश्यकता का? यावर सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. या आधुनिक काळात विवाह संस्कारात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे प्रदूषण केले जाते शिवाय पैशांचा सुध्दा अपव्यय केला जातो.
असा कुठलाही प्रकार या विवाहसोहळ्या दरम्यान करण्यात आला नाही. वर आणि वधुचे पोषाखावर कुठलाही निष्फळ खर्च न करता साध्या भारतीय वेषात विवाह संस्कार सोहळा पार पडला.या विवाह सोहळ्यात देवरी स्वच्छता दुतांचा नवदापत्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
भेटवस्तूंच्या स्वरूपात दिली पुस्तके
या विवाह सभारंभात भेटवस्तूच्या स्वरुपात शैक्षणिक साहित्य व पुस्तके देण्याचे आवाहन नवदांपत्याकडून करण्यात आले होते. पाहुण्यांकडून अनेक शैक्षणिक साहित्य, पुस्तके भेटवस्तूच्या स्वरुपात मिळाले. चालू शैक्षणिक वर्षात शाळा व ग्रंथालयांना त्याचे वितरण करण्यात येणार आहे. असा आदर्श विवाह संस्कार सोहळ्याचे आयोजन प्रत्येक परिवाराने करुन एक आदर्श समाज घडविण्यासाठी नवदांपत्यांनी सहकार्य केले.
वºहाड्यांना सामुदायिक प्रार्थनेचे पुस्तक
लग्न सोहळ्यात शुभाशिर्वाद देण्यासाठी आलेल्या वऱ्हाड्यांना व राष्ट्रसंतानी रचलेल्या सामुदायिक ध्यान व प्रार्थनेची पुस्तक नवदांपत्याकडून देण्यात आली. विवाह संस्कार सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांचे बेटी बचाओ बेटी पढाओ व सप्तपदी स्वच्छतेची चा संदेश देणारे बॅचेस लाऊन एका अनोख्या स्वरुपात स्वागत करण्यात आले.
असा परिवर्तनवादी विवाह सोहळा कर्मकांड विरहित करण्याचे धाडस या नवदापंत्यांनी दाखवल. कुलदीप लांजेवार तरुणाची कल्पकता, हिम्मत ही निश्चित बोहल्यावर चढणाऱ्या तरुण मित्रांना प्रेरणा देईल. पुन्हा एकदा या क्रांतीकारी सत्कार्याला जयगुरू.
- ज्ञानेश्वर रक्षक, प्रवर्तक श्रीगुरूदेव युवामंच.