डव्वा/स ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात देशातून प्रथम; एक कोटी पुरस्काराची मानकरी

By नरेश रहिले | Updated: April 20, 2025 19:28 IST2025-04-20T19:28:09+5:302025-04-20T19:28:21+5:30

‘क्लायमेट ॲक्शन स्पेशिएल पंचायत अवॉर्ड’

Dawa/S Gram Panchayat wins first place in the country in National Panchayat Award; Winner of one crore award | डव्वा/स ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात देशातून प्रथम; एक कोटी पुरस्काराची मानकरी

डव्वा/स ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात देशातून प्रथम; एक कोटी पुरस्काराची मानकरी

गोंदिया: जिल्ह्यातील सडक- अर्जुनी तालुक्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२३ -२४ अंतर्गत भारत देशातून प्रथम पुरस्कार पटकविला आहे. हवामान बदलाचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी यावर ग्रामपंचायतीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘क्लायमेट ॲक्शन स्पेशिएल पंचायत अवॉर्ड’ हा पुरस्कार मिळाला आहे. परिणामी ही ग्रामपंचायत एक कोटी पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तर कर्नाटक राज्यातील बिरडाहल्ली ग्रामपंचायतीने द्वितीय आणि बिहारच्या मोतीपूर ग्रामपंचायतीने तृतीय पुरस्कार पटकविला आहे.या पुरस्काराची घोषणा आज २० एप्रिल रोजी शासनाने केली आहे.

ग्रामपंचायत डव्वाच्या या विशिष्ट कामगिरीचे कौतुक करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. वासनिक यांनी कौतूक केले आहे. डव्वा/स ग्रामपंचायतच्या सरपंच योगेश्वरी चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी सिंधू रामचंद्र सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे तापमाणात वाढ होत आहे. याचा परिणाम मानवी शरीर आणि वनस्पती पिकांवर होत आहे. हे थांबवायचे असेल तर आधी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे,असे सांगून घरोघरी सौर ऊर्जेचा वापर करणे, प्लास्टिक बंदी, फटाके बंदी अश्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. निसर्गाच्या पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश पंचतत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही. एवढेच नाहीतर जैवविविधतेचेही अस्तित्व राहणार नाही याची जाणीव ठेवून आमच्या ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले आहे, असे त्यांनी सांगितले.

११ एप्रिल रोजी केली होती पाहणी
भारतसरकार दिल्लीच्या चमुने ११ एप्रिल २०२५ रोजी या ग्रामपंचायतीची पाहणी केली. या चमूमध्य अनुराधा, नीलिमा गोएल या अधिकाऱ्यांचा समावेश होता. हा पुरस्कार मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरूगानंथम, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी एम. एम. वासनिक, एस. आय. वैद्य,सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती चेतन वडगाये, उपसभापती निशा काशिवार, गट विकास अधिकारी रविकांत सानप, दिलीप खोटेले यांच्या मार्गदर्शनात विस्तार अधिकारी रवींद्र पराते, वाय. सी. पटले, उपसरपंच सुनील घासले, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि गावकरी यांच्या परिश्रमाचे फळ आहे.

Web Title: Dawa/S Gram Panchayat wins first place in the country in National Panchayat Award; Winner of one crore award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.