मुलामुलींच्या लग्नाच्या दिवशी वडील कामावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2016 12:44 AM2016-05-26T00:44:02+5:302016-05-26T00:44:02+5:30
स्वत:च्या मुलामुलींच्या लग्नाच्या दिवशी आपण कामावर असल्याचे पित्याने दाखवून स्वत:वरच ओढावून घेतले आहे.
इलमे यांचे कृत्य : गुन्हा दाखल करण्याची मागणी
काचेवानी : स्वत:च्या मुलामुलींच्या लग्नाच्या दिवशी आपण कामावर असल्याचे पित्याने दाखवून स्वत:वरच ओढावून घेतले आहे. सदर माहिती माहितीचा अधिकाराखाली मागितलेल्या माहितीच्या अर्जामुळे बाहेर आली. सदर कृषी सहायक एन.एस. इलमे हे गोरेगाव तालुक्याच्या चोपा मंडळात कार्यरत आहे.
कृषी सहायक नाना इलमे यांच्या करडी येथील मुला व मुलीचे लग्न १८ ते २५ एप्रिलदरम्यान होते. या दरम्यान सहा दिवस तिरोडा तालुक्यातील भोंबुळी, खुरकुडी व सरांडी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात कामे दाखविण्यात आले आहेत. दोन दिवस बोटे आणि गोेरेगाव येथे दाखविण्यात आले आहेत.
साडे तीन महिन्यात काम केल्याची दैनंदिनी देण्यात आली. त्यात अनेक चुका असून मंडळ कृषी अधिकारी व पर्यवेक्षक चोपा यांनी या दैनंदिनीला पारित केले. कृषी सहायक नाना एस. इलमे यांनी मे २०१५ मध्ये तिरोडा तालुक्यात १० दिवस दाखविले. यात तीन दिवस तिरोडा तालुका कृषी कार्यालयात तांत्रीक काम दाखविले. उरलेल्या सात दिवसात शेतकऱ्यांची कामे यंत्र धारकांना समजावणे, खात्याचे मोजमाप करणे, आदी कामे केल्याचे दाखविण्यात आले आहे.
जून २०१५ मध्ये १२ दिवस तिरोड्यात असायला पाहिजे. कारण तालुका कृषी अधिकारी गोरेगाव यांचे पत्र क्र. ६३३ दिनांक १२ जून २०१५ नुसार कृषी सहायक नाना एस. इलमे हे प्रतिनियुक्ती ठिकाणी कार्यरत होते. पत्र मिळताच याच दिवशी १२ जूनला कृषी सहायक नाना इलमे यांनी तालुका कृषी अधिकारी गोरेगाव यांना तिरोडा तालुक्यातून १२ जूनला मध्यान्ह्यापूर्वी सोडून पदस्थापनेसाठी कायम स्वरुपी रुजू झाल्याचे पत्र दिले. एन.एस. इलमे हे १३ जूनला तिरोडा कार्यालयात आल्याचे दिसून येते.
परंतु हा दौरा दाखविण्यात आला हे सुद्धा चुकीचे असल्याचे कृषी विभाग तिरोडाचे म्हणणे आहे. जून महिन्यात मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांना प्रति नियुक्तीवर आलेल्या कृषी सहायकाला कार्यमुक्त आले का अशी विचारणा करण्यात आली होती. तेव्हा तालुका कृषी कार्यालयातून कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले होते. याचाच अर्थ कृषी सहायक नाना इलमे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने आपल्या मर्जीॅचे मालक आहेत. (वार्ताहर)
दैनंदिनी मंजूर केली कशी ?
मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक शासनाचे किती कर्मशील नोकर आहेत हे कृषी सहायकाच्या दैनंदिनाला मंजूर करुन स्वाक्षरी केली आहे. त्यांनी एलटीसीचे आदेश दिले नाही. कृषी सहायक इलमे यांच्या घरच्या लग्नासभारंभात उपस्थित राहिले. तरीपण हे अधिकारी कामावर असल्याच्या ठिकाणी खोट्या दैनंदिनीवर स्वाक्षरी करुन मंजूर करतात किती नवलाची बाब आहे.दैनंदिनीवरुन कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची, कृषी विभागाची व अधिकाऱ्यांची फसवणूक केल्यासंदर्भात पोलिसात तक्रार नोंदविण्याची मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.