लॉकडाऊनमध्येही ‘दे दारू’; दुकाने बंद असूनही विक्री जोरात! (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:27 AM2021-05-22T04:27:55+5:302021-05-22T04:27:55+5:30

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सर्व बाजारपेठा बंद झाल्या आहेत. अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याचे आदेश ...

‘De Daru’ also in lockdown; Sales loud despite shops closed! (Dummy) | लॉकडाऊनमध्येही ‘दे दारू’; दुकाने बंद असूनही विक्री जोरात! (डमी)

लॉकडाऊनमध्येही ‘दे दारू’; दुकाने बंद असूनही विक्री जोरात! (डमी)

googlenewsNext

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सर्व बाजारपेठा बंद झाल्या आहेत. अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याचे आदेश सरकार व जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. संचारबंदी सुरू असतानाही मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जात आहे. सन २०१९-२० व सन २०२०-२१ या दोन वर्षांत जिल्ह्यातील तळीरामांनी २५१ कोटी ५० लाख रुपयांची दारू पोटात रिचविली आहे. कोरोनामुळे सन २०२० च्या महिना दीड महिनाभर दारू दुकाने बंद होती. तर यंदाही दोन महिन्यापासून दारू दुकाने बंद असतानाही सर्रास दारूचा महापूर वाहत आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी या दारू महसुलाचा मोठा हातभार लागतो. जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ९० कोटींची ८८ लाख ५१ हजार ५६७ लिटर देशी दारू, ३१ कोटींची १३ लाख ७१ हजार विदेशी दारू तर ५ कोटींची ११ लाख लिटर बीअर विक्री करण्यात आली. सन २०२०-२१ मध्ये ८७ कोटींची ८७ लाख १८ हजार २९१ लिटर देशी दारू, ३५ कोटींची १५ लाख ३२ हजार विदेशी दारू तर ३ कोटी ५० लाख रुपयांची ८ लाख ५० हजार लिटर बीअर विक्री करण्यात आली. या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील तळीरामांनी २५१ कोटी ५० लाख रुपयांची दारू ढोसली आहे.

............................

महसूलला दारूचा आधार

१) गोंदिया जिल्हावासीय वर्षाकाठी १२५ कोटींपेक्षा अधिकची दारू प्राशन करीत आहेत.

२) गेल्यावर्षी १ कोटी १३ लाख २२ हजार ५६७ लिटर तर यंदा १ काेटी ११ लाख २९१ लिटर दारू विक्री झाली आहे.

३) सन २०१९-२० च्या तुलनेत सन २०२०-२१ मध्ये २ लाख २२ हजार २७६ लिटर दारूची कमी विक्री झाली आहे.

................

बीअरची विक्री घटली, विदेशीची वाढली

१) गोंदिया जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ५ कोटी रुपये किमतीची ११ लाख लिटर बीअर विक्री करण्यात आली. तर सन २०२०-२१ मध्ये ३ कोटी ५० लाख रुपये किंमतीची ८ लाख ५० हजार लिटर बीअर विक्री करण्यात आली.

२) गोंदिया जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३१ कोटी रुपये किमतीची १३ लाख ७१ हजार विदेशी दारू विक्री करण्यात आली. तर सन २०२०-२१ मध्ये ८७ कोटी १५ लाख ३२ हजार रुपये किमतीची विदेशी दारू विक्री करण्यात आली.

३) सन २०-१९ मध्ये ९० कोटींची ८८ लाख ५१ हजार ५६७ लिटर देशी दारू तर सन २०२०-२१ मध्ये ८७ कोटींची ८७ लाख १८ हजार २९१ लिटर देशी दारू विक्री करण्यात आली.

......................

एक कोटी ३० लाखांची दारू जप्त

१) राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात अवैध दारू, नकली दारू व नियमाबाहेर जाऊन दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे.

२) सन २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात अवैध दारूसंदर्भात ७५२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या प्रकरणातील माल जप्त करण्यात आला आहे.

३) वर्षभरात एकट्या गोंदिया जिल्ह्यात १ कोटी ३० लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

४) दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत असून नियमात राहूनच दारू विक्री करावी लागते. दारूची अवैध वाहतूक किंवा अवैध विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाते.

...................

१ कोटी ११ लाख लिटर दारू रिचविली

सन २०१९-२०----- ११३२२५६७ लिटर

सन २०२०-२१----- १११००२९१ लिटर

..........................

काेट

जिल्ह्यात नकली दारू व अवैध दारू विक्री होऊ नये यासाठी शासनाच्या नियमानुसारच परवानाधारक दुकानदारांनी दारू विक्री करावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अवैध दारू विक्रेत्यांना लगाम लावण्यासाठी मागील वर्षभरात जिल्ह्यात ७५२ गुन्हे दाखल करून कोट्यवधींची दारू जप्त करण्यात आली.

- प्रवीण तांबे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गोंदिया.

Web Title: ‘De Daru’ also in lockdown; Sales loud despite shops closed! (Dummy)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.