जिवंत माणसाला मयत दाखवून घरकुल केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 09:40 PM2018-09-29T21:40:24+5:302018-09-29T21:41:53+5:30

गावातील जिवंत व्यक्तीला मयत दाखवून त्याच्या नावावर मंजूर करण्यात आलेले घरकुल रद्द करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. येथील पंचायत समिती अंतर्गत कोहमारा येथे हा प्रकार घडला आहे.

The dead will be slaughtered and the house is closed | जिवंत माणसाला मयत दाखवून घरकुल केले रद्द

जिवंत माणसाला मयत दाखवून घरकुल केले रद्द

Next
ठळक मुद्देकोहमारा येथील प्रकरण : दोषींवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : गावातील जिवंत व्यक्तीला मयत दाखवून त्याच्या नावावर मंजूर करण्यात आलेले घरकुल रद्द करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. येथील पंचायत समिती अंतर्गत कोहमारा येथे हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायतच्या काराभाराप्रती गावकऱ्यांत चांगलाच रोष खदखदत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
कोहमारा येथील रहिवासी प्रमोद वामन तडोसे यांना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर करण्यात आले. मंजूर यादी तपासणीकरिता वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मौका चौकशीकरिता गावात येतात. पण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मौका चौकशी न करता घरी बसून चौकशी केल्यामुळे तडोसे यांना मयत दाखवून त्यांना मंजूर करण्यात आलेले घरकुल नामंजूर करण्यात आल्याची बाब पूढे आली आहे.
संबंधित लाभार्थी पंचायत समितीत घरकुल बाबद चौकशीला गेले असता यादीत ते मयत असल्याचे नमूद दिसले. तडोसे हे आर्थिक दृष्टया कमकुवत असून त्यांना रहायला घर नसल्याने दुसºयाच्या घरी एका खोलीत आपले जीवन काढत आहे. तडोसे यांचे वॉर्ड क्र मांक ३ कोहमारा टोली येखे असून ते आता पडक्या खोलीत राहत आहे. तालुक्यात गरजू लाभार्थ्यांना घरकुल न देता ज्यांचे मोेठे घर आहे त्यांना घरकुल मंजूर केले जात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मात्र गरजू-गरीब लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. त्यात मात्र जीवंत माणसाला मयत दाखवून त्याचे घरकुल रद्द करणे म्हणजे हद्दच झाली आहे. त्यामुळे अशा या बेजबाबदार व निष्काळजी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन तडोसे यांना घरकुल देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

घरकुल यादीची मोका चौकशी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन तडोसे यांना न्याय देण्यात येईल.
राजेश कठाणे, उपसभापती पं.स.सडक-अर्जुनी

पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या संबंधीत जबाबदार अधिकाऱ्यांनी अशा गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. गरजू लाभार्थ्याना घरकुल हक्काने दिले पाहिजे. पण जिवंत व्यक्तीला मयत दाखवून घरकुल नामंजूर करणे ही गंभीर बाब आहे.
माधुरी पातोडे, जि.प.सदस्य गोंदिया

संबंधित लाभार्थ्याची चौकशी करुन घरकुल देण्यात येणार आहे. बेजबाबदार कर्मचाºयांवर कारवाई केली जाईल.
कवीता रंगारी, माजी पं.स.सभापती सडक-अर्जुनी

Web Title: The dead will be slaughtered and the house is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.