गोंदिया जिल्ह्यातील जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:00 AM2019-03-25T10:00:28+5:302019-03-25T10:01:02+5:30

त्रिपुरा स्टेट रायफलच्या ३ बटालियनचे जवान अतिराज भाऊराव भेंडारकर यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज (दि.२५) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Death during treatment of Jawan of Gondia district | गोंदिया जिल्ह्यातील जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next
ठळक मुद्देशासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: त्रिपुरा स्टेट रायफलच्या ३ बटालियनचे जवान अतिराज भाऊराव भेंडारकर यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज (दि.२५) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गोंदिया पोलीस मुख्यालयात पोलीस विभागाच्यावतीने शहिदाला आदरांजली वाहण्यात आली. अतिराज आजारी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना २३ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्रिपुरा येथून त्यांचे पार्थिव विमानाने रायपूर विमानतळावर आणण्यात आले. तेथून गोंदियाला आणण्यात आले आहे. ते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी/ पिंपळगाव येथील रहिवासी असून जन्मगावी त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

Web Title: Death during treatment of Jawan of Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू