गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्याचा विद्युत प्रवाहामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:52 PM2019-10-05T12:52:07+5:302019-10-05T12:52:32+5:30

गोंदिया येथील दासगाव परिसरात असलेल्या वनपरिक्षेत्रात शुक्रवारी संध्याकाळी एका सारस पक्ष्याचा विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला.

Death of a stork bird in Gondia district due to electric current | गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्याचा विद्युत प्रवाहामुळे मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्याचा विद्युत प्रवाहामुळे मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देगोंदिया वनपरिक्षेत्रातील दासगाव भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: येथील दासगाव परिसरात असलेल्या वनपरिक्षेत्रात शुक्रवारी संध्याकाळी एका सारस पक्ष्याचा विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला. साधारणपणे दोन वर्ष वय असलेल्या या पक्ष्याला उडताना ११ के.व्ही.च्या विद्युत वाहिनीचा धक्का लागला होता. या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली. शनिवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी बोरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशीलकुमार नांदवटे, वनक्षेत्रपाल राऊत आदींनी या घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Web Title: Death of a stork bird in Gondia district due to electric current

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.