उपचाराविना रूग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:49 PM2019-07-05T23:49:23+5:302019-07-05T23:49:53+5:30

ब्रेन हॅम्रेज झालेल्या रूग्णाला उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता दाखल केले असता त्याच्यावर तब्बल चार तास उपचार न झाल्याने त्या रूग्णाचा मृत्यू झाला. परिणामी रूग्णालय परिसरात वादंग झाला.

Death without treatment | उपचाराविना रूग्णाचा मृत्यू

उपचाराविना रूग्णाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्याच्या कानशीलात हाणली : मेडिकलमध्ये डॉक्टरांची पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ब्रेन हॅम्रेज झालेल्या रूग्णाला उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता दाखल केले असता त्याच्यावर तब्बल चार तास उपचार न झाल्याने त्या रूग्णाचा मृत्यू झाला. परिणामी रूग्णालय परिसरात वादंग झाला. यात एकाने आरोग्य कर्मचाºयाच्या कानशिलात हाणली. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राध्येश्याम शंकर सोनवाने (३५) रा. परसोडीटोला तिल्ली-मोहगाव ता. गोरेगाव असे मृतकाचे नाव आहे. त्याला ब्रेनहॅम्रेज झाल्यामुळे नातेवाईकांनी सकाळी ११.३० वाजता उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणले. परंतु तब्बल दोन तास त्या रूग्णाला दाखल करुन घेण्यात आले नाही.
नातेवाईकांनी गोंदियातील सामाजिक कार्यकर्ता पंकज यादव यांना फोन करून माहिती दिली. यावेळी न्यायालय परिसरात असलेल्या पंकज यादव यांनी वैद्यकीय अधिष्ठाता पी.व्ही.रूखमोडे यांना फोन करून उपचार करण्यासाठी डॉक्टरची व्यवस्था करा असे सांगितले.रूखमोडे यांनी डॉ. वैद्य यांना फोन करून त्या रूग्णाचा उपचार करण्यास सांगितले. परंतु त्यांनी सांगितल्यानंतरही डॉ.वैद्य तिथे उपस्थित न झाल्यामुळे दुपारी ३.३० वाजता त्या रूग्णाचा मृत्यू झाला. याचवेळी रुग्णाचे नातेवाईक आक्रोश करीत होते.
पंकज यादव व त्यांचे सहकारी सुध्दा तिथे आले. नागरिकांनी बरीच गर्दी केली. या वेळी वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांचा उपचार होत नसल्याची ओरड सुरू असतांना वैद्यकीय महाविद्यालयातील लिपीक कटरे तिथे आले असतांना एकाने त्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे बराच गोंधळ उडाला. वेळीच पोलीस दाखल झाले. मारहाण करणाºया व्यक्तीला ताब्यात घेतले.त्यानंतर पंकज यादव यांनी वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याशी चर्चा केली.
उपचार न केल्यामुळे रूग्णाचा मृत्यू होणे ही बाब गोंदियासाठी अत्यंत दुखदायी असून डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली. यासंदर्भात माहिती देतांना डॉ. रूखमोडे म्हणाले, मेडीसीन विभागात नऊ डॉक्टरांची कमतरता आहे. एमडी डॉक्टर शासन देत नाही आणि दिले तरी कुणी यायला तयार नाहीत. त्यामुळे ज्युनियर एमबीबीएस डॉक्टरांच्या भरवश्यावर रूग्णांची काळजी घ्यावी लागत असल्याचे सांगितले.

आयसीयू केले रिकामे
मागील सहा महिन्यापासून आयसीयू विभागाची स्वच्छता न झाल्यामुळे आयसीयुमधील रूग्णांना वॉर्ड क्र.२ येथे ठेवून तेथील स्वच्छता आजच करण्यात आली. परंतु आयसीयू खाली करतांना गंभीर रूग्णांसाठी पर्यायी व्यवस्था काहीच करण्यात आली नाही. त्या रूग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा
रूग्णाच्या नातेवाईकांनी आक्रोश केला त्यावेळी गोळा झालेल्यांपैकी दिनू यादव नावाच्या इसमाने लिपीक कटरे यांना मारहाण केल्यामुळे त्याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Death without treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.