निर्वाह निधीचे नापरतावा कर्ज लवकर द्यावे
By admin | Published: April 23, 2016 01:49 AM2016-04-23T01:49:13+5:302016-04-23T01:49:13+5:30
मुला-मुलींचे लग्न, जमिनीची खरेदी अशा विविध कारणासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या भविष्य निर्वाह निधीमधून
तिरोडा : मुला-मुलींचे लग्न, जमिनीची खरेदी अशा विविध कारणासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या भविष्य निर्वाह निधीमधून नापरतावा लोन काढून आपली कामे करवून घेतात. परंतु विविध कारणे दाखवून लोनचे केसेस परत पाठविले जातात. तर काहींचे प्रस्ताव दोन-दोन महिन्यांतरही मंजूर होत नाही, ही वास्तविकता प्रत्यक्षात दिसून येत आहे. तरीपण अशा पेंडींग केसेस तत्काळ काढून त्यांना त्यांच्या लोनचे पैसे लवकर मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य काँग्रेस शिक्षक सेलने केली आहे.
भविष्य निर्वाह निधीचे प्रकरण लवकर निकालात काढावे, वेळेवर कर्मचाऱ्यांचे वेतन व्हावे यासाठी शिक्षण विभागाने वेतन पथकाचे स्वतंत्र कार्यालय निर्माण केले. ज्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे नापरतावा लोन आहे. त्यांचेकडून साधारणत: चिरीमिरी घेतल्याशिवाय त्यांच्या केसेस काढल्या जात नाही. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला असून ज्यांनी पैसे दिले नाही त्यांची केस परत येईल या भितीपोटी साधारणत: बहुतेकजन पैसे देतातच. पण ज्यांनी नाही दिले किंवा त्यांच्या मर्जीनुसार किंवा कमी दिले तर त्यांचे लोनचे केसेस दोन-दोन महिने मंजुर केल्या जात नाही.
अशा पेडींग केसेस निकाली काढाव्यात. शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी यांनी लक्ष घालून तसेच आदेश द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष डी.आर. गिरीपुंजे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)