जिल्ह्यातील २१ हजार ७६१ शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:00 AM2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:25+5:30

मागील वर्षी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली होती. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना फेब्रुवारी २०२० पासून मिळणार होता. यातंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार होते. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा ५० हजार रुपये प्रोत्साहानपर लाभ देण्याची घोषणा केली.

Debt waiver to 21 thousand 761 farmers in the district | जिल्ह्यातील २१ हजार ७६१ शेतकऱ्यांना कर्जमाफी

जिल्ह्यातील २१ हजार ७६१ शेतकऱ्यांना कर्जमाफी

Next
ठळक मुद्देमहात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : आतापर्यंत तीन याद्या प्राप्त : ४ हजार ५६७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली. यातंर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. यासाठी जिल्ह्यातील २९ हजार शेतकरी पात्र ठरले होते. यातंर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील २१ हजार ७६१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. तर ४ हजार ५६७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे.
मागील वर्षी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली होती. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना फेब्रुवारी २०२० पासून मिळणार होता. यातंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार होते. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा ५० हजार रुपये प्रोत्साहानपर लाभ देण्याची घोषणा केली.
यातंर्गत शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार प्रमाणीकरण करुन त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जात आहे. यातर्गंत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यात सर्वाधिक १९ हजार १११ शेतकरी सभासद गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहेत. १९ हजार १११ शेतकऱ्यांना एकूण ६३ कोटी २२ लाख २७ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. सदर रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे.
इतर बँकाच्या २७६१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून आत्तापर्यंत एकूण २१ हजार ७६१ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतंर्गत एकूण ९० कोटी ४१ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. बँका आणि सहकार उपनिबंधक कार्यालयाला एकूण तीन याद्या प्राप्त झाल्या आहे.
तिसऱ्या यादीत ३०९० शेतकऱ्यांच्या समावेश आहे. तर ४५६७ शेतकऱ्यांचे बँक खाते आधार प्रमाणीकरण करण्यात आले असून या शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार उपनिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

७ हजार शेतकरी प्रतीक्षेत
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसह जिल्ह्यातील एकूण २९ हजार शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत २१ हजार ७६१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. तर काही शेतकऱ्यांचे बँक खाते आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जवळपास ७ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.

Web Title: Debt waiver to 21 thousand 761 farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.