कर्जमाफी व जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:31 PM2017-09-11T22:31:10+5:302017-09-11T22:31:24+5:30
दसरापूर्वी शेतकºयांना कर्जमुक्त करावे, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करून आर्थिक मदत देण्यात यावी .....
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दसरापूर्वी शेतकºयांना कर्जमुक्त करावे, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करून आर्थिक मदत देण्यात यावी तसेच पाण्याची समस्या लक्षात घेता प्रकल्पांतील पाणी कंपन्यांना देऊ नये या मागण्यांसाठी जिल्हा शिवसेनेच्यावतीने सोमवारी (दि.११) मोर्चा काढण्यात आला. तसेच येथील जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यानंतरही कोणत्याही प्रकारची कर्जमुक्ती झालेली नाही. मुख्यमंत्री कर्जमाफी च्या नावावर शेतकºयांची दिशाभूल करीत आहेत. कर्जमाफीच्या या विषयाला घेऊन शिवसेनेने यापूर्वीही ढोल वाजवून शासनाला जागविण्याचे काम केले. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. यावर आता शिवसेनेने दसरापूर्वी पूर्ण कर्जमाफी करावी, जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करावा, शेतकºयांना हेक्टरी २० हजार रूपयांची आर्थिक मदत द्यावी. तसेच भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता वीज कंपन्यांना प्रकल्पातील पाणी देऊ नये अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.
आपल्या मागण्यांना घेऊन शिवसेनेने सोमवारी (दि.११) शहरात मोर्चा काढला. तसेच जिल्हाधिकारी काळे यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे, मुकेश शिवहरे, उप जिल्हाप्रमुख सुनील लांजेवार, तेजराम मोरघडे, तालुकाप्रमुख राज बोंबार्डे, सदाशिव विठ्ठले, मुन्ना बहेकार, सुनील मिश्रा, विक्रम बैस, गुणवंत डोहळे, अरविंद राठोड, राजा भाटीया, प्रशांत ठवकर, श्रीकांत चंद्रवंशी, रितेश वर्मा, निरज रहांगडाले, गजेंद्र फुंडे, हिमांशू कुथे, हर्षल पवार, संजू समशेरे, प्रशांत कोरे, अमन हरिणखेडे, गेंदलाल बिसेन, विनोद तामसेटवार, चु्न्नी चौरावार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.