तालुक्यात दुष्काळ घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:31 AM2017-08-23T00:31:23+5:302017-08-23T00:31:42+5:30
तिरोडा तालुक्यामध्ये यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकºयांनी धानपिकाची रोवणी केली नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी-डाकराम : तिरोडा तालुक्यामध्ये यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकºयांनी धानपिकाची रोवणी केली नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकºयांना आधार देण्यासाठी शासनाने संपूर्ण तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे.
यंदा हवामान खात्याच्या अंदाजामुळे तिरोडा तालुक्यातील संपूर्ण शेतकºयांनी मृग नक्षत्राची चाहुल लागताच शेतामध्ये मशागत करण्यास सुरुवात केली. पण रोहिणी नक्षत्राने दगा दिला. पुन्हा शेतकरी रात्रंदिवस शेतीची मशागत करीत होते. मृग नक्षत्रामध्ये शेतकºयांनी शेतामध्ये पºहे टाकले. रोपवाटिका लवकर होईल, यासाठी शेतीची मशागत ट्रॅक्टरने केली. शेतकºयांनी पºहांना रासायनिक खताचा डोज दिला. पºहे चांगले वाढले. पण पावसाचा लहरीपणा सुरु झाला. रोहणी, मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्प, आश्लेषा व मघा हे सर्वच नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान खात्याचे अंदाज देखील वांरवार चुकत आहेत. हवामान खात्यावरील शेतकºयांचा विश्वास उडाला आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांनी रोवणीची कामे आटोपली. मात्र बºयाच शेतकºयांची रोवणी खोळंबली आहे. यंदा अल्प पाऊस झाल्याने शेतकºयांनी शेतामध्ये धानाची रोहणी केली नाही. पºहेसुध्दा उन्हाने वाळत, करपत आहेत. आॅगस्ट महिन्यामध्ये हलक्या धानाची मुदत निघून जाते. सप्टेंबर महिन्यामध्ये हलक्या धानाची लोंब निघतात. फक्त १३० ते १४० दिवसांमध्ये धानाची पुन्हा मुदत संपत आहे. आॅगस्ट महिन्यामध्ये पाऊस कमी आला. त्यामुळे धानापिकांची रोपे करपली आहेत.