पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:28 AM2021-05-16T04:28:12+5:302021-05-16T04:28:12+5:30

गोंदिया : राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार व छायाचित्रकारांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य ...

Declare journalists frontline workers | पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा

पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा

Next

गोंदिया : राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार व छायाचित्रकारांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी गुरुवारी (दि.१३) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.

कोरोना साथीच्या काळात रुग्णालयात जाऊन, स्मशानभूमीत जाऊन जनसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधून पत्रकार या काळात काम करीत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यात सुद्धा पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. देशातील सुमारे १२ राज्यांत प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. कोरोना साथीच्या लाटेत अनेक पत्रकारांना मुकण्याची पाळी आली आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. अशात त्यांच्या सुरक्षेची, जीवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. अशात त्यांना फ्रंटलाइन वर्कर्स जाहीर केल्यास आपसूकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल. करिता पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करण्याबाबत निर्णय तत्काळ आणि विनाविलंब घ्यावा, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

Web Title: Declare journalists frontline workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.