वनाच्या संर्वधनासाठी माझे आयुष्य समर्पित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 09:52 PM2019-04-27T21:52:52+5:302019-04-27T21:53:16+5:30
झाडे लावा झाडे जगवा, या मूलमंत्राची पाठीशी गाठ बांधून एक ध्येयवेडा सरकारी अधिकारी गावोगावी फिरला, लोकांसमोर दरवर्षी एक तरी झाड लावा अशी संकल्पना ठेवली आणि सुरु झाला वृक्षसंवर्धनाचा एक अनोखा प्रवास.
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
झाडे लावा झाडे जगवा, या मूलमंत्राची पाठीशी गाठ बांधून एक ध्येयवेडा सरकारी अधिकारी गावोगावी फिरला, लोकांसमोर दरवर्षी एक तरी झाड लावा अशी संकल्पना ठेवली आणि सुरु झाला वृक्षसंवर्धनाचा एक अनोखा प्रवास.
मुरदोलीची रोपवाटिका ते सोदलागोंदी येथील झाडांना राखी बांधणारे गाव, ही ओळख आज जिल्ह्यातच नाही तर साऱ्या महाराष्टÑात झाली आहे. ही सारी किमया केली ती एका वनपरिक्षेत्राधिकाºयाने, गोरेगाव तालुक्यातील एस.एम.जाधव असे त्या वनपरिक्षेत्राधिकाºयाचे नाव आहे. एक ध्येयवेडा माणूस,झाडावर प्रेम करणारा माणूस, झाडाविषयीच बोलणारा माणूस, अखंड अथक परिश्रम करुन लोकांना झाडे लावण्याचे आवाहन करणाºया दिलखुलास सरकारी अधिकाºयाची लोकमतने घेतलेली खास मुलाखत लोकमतच्या वाचकांसाठी.
वनपरिक्षेत्राधिकारी एस.एम.जाधव मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील. तीन वर्षापूर्वी ते गोरेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात रुजू झाले. हळूहळू त्यांनी वृक्षावर प्रेम करणाºया लोकांशी संपर्क साधून वृक्ष लागवड ते वृक्ष-संवर्धनाची चळवळ कशी उभी करता येईल, याविषयी लोकांचे मत जाणून घेतले. त्यांनी सर्वप्रथम मुरदोली रोपवाटिकेचा ज्वलंत प्रश्न हाती घेतला. होतकरुन व इमाने इतबारे काम करणाºया देवेंद्र बी.तुरकर यांना मुरदोली रोपवाटीकेच्या उत्थानासाठी प्रेरित केले. पुढे मुरदोली रोपवाटिका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनरक्षक तुरकर यांच्या अथक परिश्रमातून बहरु लागली. जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्टÑात मुरदोली रोपवाटिकेचा नावलौकीक झाला. वड, पिंपळ, उमर ही झाडे जगविण्याने जगत नाही, ती झाडे मुरदोली रोपवाटिकेने जगविली आणि शेवटी वड पिंपळाचे झाड जगविणारी महाराष्ट्रातील पहिली रोपवाटीका हा मुरदोली मध्यवर्ती रोपवाटीकेला मान मिळाला. नवे-नवे संशोधन, झाडाच्या नव्या प्रजाती व त्याविषयी सखोल अभ्यास असणाºया वनपरिक्षेत्राधिकारी जाधव यांना पुणे येथील कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून बोलविण्यात आले. आज घडीला मुरदोली रोपवाटीकेत वडाची पाच हजार, पिंपळ पाच हजार व उमराची एक हजार झाडे डौलात उभी आहेत. मुरदोली रोपवाटीत विविध प्रजातीची १ लाख २८ हजार ९०० झाडे आहेत. १९६९ ला या रोपवाटीकेची निर्मिती करण्यात आली होती. या रोपवाटिकेत निसर्गाची झालर पाहायला मिळते. वनपरिक्षेत्राधिकारी जाधव इथवरच थांबले नाही तर त्यांनी पुढे सोंदलागोंदी गावाला भेट दिली.तेथील सरपंच शशेंद्र भगत यांना हाताशी घेत सोंदलागोंदीत वनसंवर्धनावर एक मोठी क्रांती उदयास आणली.या गावानेही जाधव यांच्या वृक्षप्रेमापोटी वृक्षसंवर्धनासाठी स्वत:ला झोकून दिले. या गावातूनच सुरु झाला नवा प्रवास, रक्षाबंधनाच्या दिवशी साºया गावाने झाडाला राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा विडा उचलला. नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा या गावाने वेढलेल्या असल्यामुळे निसर्गाचा अप्रतिम देखावा या गावात गेल्यावर पहायला मिळतो. पुढे या गावात जाधव यांच्या मार्गदर्शनात विविध समित्यांचे गठण करण्यात आले. लोकही वृक्षसंवर्धनासाठी पुढे आले गावातच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या. विदेशी पाहुण्यांची पायवाट या गावात तयार झाली. अखेर जाधव यांच्या दूरदृष्टीमुळे या गावानेही इतिहासाच्या पानावर स्वत:चे नाव कोरुन घेतले. मागील वर्षी जाधव यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना, नागरिकांना हाताशी घेवून एकट्या गोरेगाव तालुक्यात एक लाख, अकरा हजार अकराशे झाडे लावून शासनाच्या वृक्ष लावा, वृक्ष जगवा, अभियानाला यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. विविध कार्यक्रम व त्या कार्यक्रमातून सर्व सामान्य नागरिकांना झाडे लावण्यासाठी प्रेरित केले. जाधव यांचीही धडपड पाहून वृक्षप्रेमीही जाधव यांच्या पाठीशी उभे राहिले.