लखनसिंह कटरे यांच्या अवरुद्धलेल्या रुंद वाटा काव्यसंग्रहाचे लोकार्पण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:47+5:302021-06-23T04:19:47+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नरेंद्र शुक्ला होते, तर काव्यसंग्रहावर भाष्य करण्याकरिता भवभुती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे व डॉ. अनिल ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नरेंद्र शुक्ला होते, तर काव्यसंग्रहावर भाष्य करण्याकरिता भवभुती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे व डॉ. अनिल मुंजे हे प्रामुख्याने उपस्थित होते. हा कवितासंग्रह कवी कसे जगले, त्यांना कसे जीवनातून जीवनानुभव प्राप्त झाले, त्या जीवनानुभवातूनच हा काव्यसंग्रह तयार झालेला आहे. एकंदरीत हा काव्यसंग्रह वैचारिक स्वरूपाचा असून वर्तमान स्थितीची समीक्षा करणारा आहे. चंद्रपूर जिल्हा झाडीबोली साहित्य मंडळाच्यावतीने वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी ‘अवरुद्धलेल्या रुंद वाटा’ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली असल्याचे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी सांगितले. ॲड. लखनसिंह कटरे यांची एकूण सात कवितासंग्रह, एक काव्यसंग्रह व एक संकीर्ण संग्रह अशी नऊ मराठी, एक हिंदी (कविता संग्रह), एक पोवारी बोलीतील संकीर्ण संग्रह आणि एक हिंदी अनुवाद (दीर्घ कविता) अशी एकूण बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लवकरच दोन पुस्तके प्रकाशित होणार आहेत. जाणिवेतील कर्कदंश या कविता संग्रहातील एक कविता जागर ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.कॉम. प्रथम वर्षाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. लोकार्पण सोहळ्याचे आयोजन ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद रंगारी यांनी केले. आभार सेवानिवृत्त प्राचार्य पुरुषोत्तम सोमवंशी यांनी मानले.