नगर पंचायतच्या कचरा गाड्यांचे लोकार्पण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:20 AM2021-07-21T04:20:20+5:302021-07-21T04:20:20+5:30
यावेळी माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, जीडीसीसी बँक संचालक रेखलाल टेंभरे, मदन पटले, चिंतामण रहांगडाले, मुख्याधिकारी हर्षला राणे, प्रशासकीय अधिकारी ...
यावेळी माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, जीडीसीसी बँक संचालक रेखलाल टेंभरे, मदन पटले, चिंतामण रहांगडाले, मुख्याधिकारी हर्षला राणे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद अग्निहोत्री यांच्यासह माजी सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार रहांगडाले यांनी माजी नगराध्यक्ष बारेवार यांच्या सोबत नगरपंचायतच्या कामांचा आढावा घेतला. तसेच मुख्याधिकाऱी राणे यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना केंद्र शासनाचा मिळालेला निधी त्वरित वाटप करण्याचे व दिव्यांग विकास निधीचे वाटप करण्यासाठी आदेशित केले. यावर मुख्याधिकारी राणे यांनी, प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच दिव्यांग विकास निधी वाटप करण्यासाठी नगर परिषद फंडात निधी उपलब्ध होताच लवकरात लवकर लाभार्थ्यांना निधी वाटपाचे कार्य पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.