गाव तलावाचे खोलीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:28 AM2021-05-16T04:28:21+5:302021-05-16T04:28:21+5:30

केशोरी : येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या गाव तलावाचे रोजगार हमी योजनेंतर्गत खोलीकरण ...

Deepen the village pond | गाव तलावाचे खोलीकरण करा

गाव तलावाचे खोलीकरण करा

Next

केशोरी : येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या गाव तलावाचे रोजगार हमी योजनेंतर्गत खोलीकरण करून पाणी साठवणूक क्षमता वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी गावालगत असलेला तलाव गावाच्या सौंदर्यात भर घालणारा असून, शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. येथील ५० टक्के शेतजमीन या तलावाच्या सिंचनाखाली येत आहे. येथील पाण्यापासून शेतीला चांगलाच उपयोग होऊन गावातील विहिरीची पाणी क्षमता सतत टिकून राहत असते. गावतलावातील सभोवतालच्या जमिनीवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून जागा काबीज केली आहे. त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपिकासाठी सिंचनाची पुरेशी व्यवस्था उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली आहे. पुढील येणाऱ्या काळात जर अशीच परिस्थिती राहिली, तर गावातील जनावरांना पिण्याचे पाणी मिळण्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने कंत्राटदारामार्फत पाळीची दगड लावून पिचिंग करून डागडुजी केली. खोलीकरणाच्या दृष्टीने कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत. या तलावातील खाली जागेचे खोलीकरण झाल्यास मोठ्या प्रमाणात शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल. शेतीच्या उत्पन्नाकरिता सिंचनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या गावतलावाचे खोलीकरण करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Deepen the village pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.