जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत देवरी पोलिसांची बाजी
By admin | Published: September 24, 2016 01:49 AM2016-09-24T01:49:51+5:302016-09-24T01:49:51+5:30
खिलाडू वृत्तीने चांगले काम केल्यास यश नक्की मिळते. जीवनात आत्मविश्वास वाढीसाठी व सकारात्मक विचारसरणीसाठी खेळ उपयुक्त ठरतात,
आमगाव दुसऱ्या क्रमांकावर : आत्मविश्वास व सकारात्मक विचारसरणीसाठी खेळ उपयुक्त- रामगावकर
गोंदिया : खिलाडू वृत्तीने चांगले काम केल्यास यश नक्की मिळते. जीवनात आत्मविश्वास वाढीसाठी व सकारात्मक विचारसरणीसाठी खेळ उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी केले.
जिल्हा पोलीस क्र ीडा स्पर्धा-२०१६ चा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रम शुक्रवारी (दि.२३) कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर डॉ.रामगावकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते (गोंदिया), मंदार जवळे (देवरी), दिपाली खन्ना (आमगाव), परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, आयबीचे पशीने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या तीन दिवसीत स्पर्धांमध्ये देवरी विभागाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. आमगाव द्वितीय तर तिरोडा विभाग तृतीय क्रमांकावर राहीला. चौथ्या क्रमांकावर गोंदिया मुख्यालय तर पाचव्या क्रमांकावर गोंदिया विभाग राहीला. (तालुका प्रतिनिधी)
विविध स्पर्धा आणि त्यातील विजेते स्पर्धक
५०० मीटर धाव (पुरूष गट) स्पर्धेत गुलाब हरिणखेडे प्रथम, कृपाण डोंगरवार द्वितीय, १००० मी. धावमध्ये शिशुपाल दमाहे प्रथम, अजय इंगळे द्वितीय, १५०० मी. धाव स्पर्धेत गुलाबचंद हरिणखेडे प्रथम, हिमेश भुजाडे द्वितीय, १५०० मी.धाव (महिला गट) रत्नकला भोयर प्रथम, ज्योती सव्वालाखे द्वितीय, ८०० मी.पुरुष- गुलाबचंद हरिणखेडे प्रथम, संजय घरतकर द्वितीय, ८०० मी. महिला- शिल्पा मते प्रथम, नितू चौधरी द्वितीय, ४०० मी.पुरुष आशिष छोेडे प्रथम, रणधीर साखरे द्वितीय, ४०० मी. महिला ज्योती बांते प्रथम, नितू चौधरी द्वितीय, २०० मी.पुरुष हितेश भुजाडे प्रथम, छगन खोटेले द्वितीय, २०० मी. महिला ज्योती बांते प्रथम, कल्पना अंबुले द्वितीय,
१०० मी.रिले पुरुष आमगाव विभाग प्रथम, तिरोडा विभाग द्वितीय, १०० मी.रिले महिला गोंदिया प्रथम, गोंदिया विभाग द्वितीय, ४०० मी.रिले पुरुष तिरोडा विभाग प्रथम, आमगाव विभाग द्वितीय, ४०० मी.ईडल्स पुरुष हितेश भुजाडे प्रथम, विजय चुलपार द्वितीय, ४०० मी.ईडल्स महिला ज्योती बांते प्रथम, रत्नकला भोयर द्वितीय, १०० मी.ईडल्स पुरुष रामेश्वर राऊत प्रथम, हिमश भुजाळे द्वितीय, १०० मी.ईडल्स गायत्री बरेजू प्रथम, रत्नकला भोयर द्वितीय, १०० मीटर महिला पोलीस मुख्यालयातील ज्योती बांते प्रथम, रत्नकला भोयर द्वितीय, १०० मीटर पुरूष आमगावचे सनोज सपाटे प्रथम, तिरोडाचे छगन खोटेले द्वितीय,
लांब उडी (पुरुष) राजू कासरे प्रथम, विशाल मरकाम द्वितीय, लांब उडी (महिला) ज्योती बांते प्रथम, श्यामकला भेयर द्वितीय, थाली फेक (पुरुष) जावेद प्रथम, तेजराम कावळे द्वितीय, थाली फेक (महिला) गायत्री बरेजू प्रथम, आशा मेश्राम द्वितीय, गोळा फेक (पुरुष) साकीर शेख प्रथम, महेश पाळे द्वितीय, गोळा फेक (महिला) संगीता गावळ प्रथम, गायत्री बरेजू द्वितीय, भाला फेक (पुरुष) कुलदीप डोळस प्रथम, पंकज खरवळे द्वितीय, भाला फेक (महिला) आशा मेश्राम प्रथम, स्मिता गजबे द्वितीय, उंच उडी (पुरुष) खेमराज कोरे प्रथम, राजेंद्र दमाहे द्वितीय, उंच उडी /महिला गायत्री बरजू प्रथम, श्यामकला भोयर द्वितीय, तिहरी उडी पुरुष विशाल मरकाम प्रथम, रामेश्वर राऊत द्वितीय.
सांघिक खेळातील विजेता-उपविजेता चमू
फुटबॉल (पुरुष) प्रथम गोंदिया, द्वितीय तिरोडा विभाग, हॅन्डबॉल (पुरुष) प्रथम देवरी विभाग, द्वितीय आमगाव विभाग, व्हॉलीबाल (पुरुष) प्रथम पो.मु.गोंदिया, द्वितीय आमगाव विभाग, व्हॉलीबॉल (महिला) प्रथम गोंदिया विभाग, द्वितीय पो.मु. गोंदिया, बास्केटबॉल (पुरुष) प्रथम देवरी विभाग, द्वितीय आमगाव विभाग,बास्केटबॉल (महिला) प्रथम गोंदिया विभाग, द्वितीय पो.मु. गोंदिया,
कबड्डी (पुरुष) प्रथम आमगाव विभाग, द्वितीय देवरी विभाग, कबड्डी (महिला) प्रथम पो.मु. गोंदिया, द्वितीत गोंदिया विभाग, खो-खो (पुरुष) प्रथम तिरोडा विभाग, द्वितीय आमगाव विभाग, खोे-खो (महिला) प्रथम पो.मु. गोंदिया, द्वितीय गोंदिया विभाग, बेस्ट अॅथलेटीक्स (महिला) ज्योती बांते पो.मु.गोंदिया, बेस्ट अॅथलेटीक्स (पुरुष) हिमेश भुजाळे तिरोडा विभाग, जनरल कॅम्पयनशीप (महिला) पो.मु. गोंदिया, जनरल चॅम्पयनशीप (पुरुष) देवरी विभागाने पटकावली.