पिठासीन अधिकारी नियुक्त

By admin | Published: July 7, 2015 12:48 AM2015-07-07T00:48:17+5:302015-07-07T00:48:17+5:30

जिल्ह्यातील ८ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एका आदेशाद्वारे केली आहे.

Delegated officer appointed | पिठासीन अधिकारी नियुक्त

पिठासीन अधिकारी नियुक्त

Next

गोंदिया : जिल्ह्यातील ८ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एका आदेशाद्वारे केली आहे. सबंधित पंचायत समितीच्या सभागृहात १२ जुलै रोजी दुपारी २ वाजता पुढील अडीच वर्षाच्या कालावधीकरीता सभापती व उपसभापती पदाची निवडणुक होणार आहे. पिठासीन अधिकारी, सबंधित पंचायत समिती आणि पंचायत समिती सभापती पदाचा आरक्षित प्रवर्ग पुढीलप्रमाणे. गोंदिया तहसीलदार संजय पवार- पंचायत समिती गोंदिया- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), देवरी उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी-पंचायत समिती देवरी-अनुसूचित जमाती (महिला), जिल्हा नियोजन अधिकारी बकुलजी घाटे-पंचायत समिती गोरेगाव-सर्वसाधारण, तिरोडा उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे-पंचायत समिती तिरोडा-नागरिकांचा मागास प्रवर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर-पंचायत समिती अर्जुनी मोरगाव-सर्वसाधारण, उपमुख्ळ कार्यकारी अधिकारी (सामान्य) राजकुमार पुराम-पंचायत समिती सालेकसा-सर्वसाधारण, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे-पंचायत समिती आमगाव-सर्वसाधारण (महिला) व उपजिल्हा निवडणुक अधिकारी विलास ठाकरे-पंचायत समिती सडक अर्जुनी-सर्वसाधारण (महिला) असा आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Delegated officer appointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.