केंद्र शासनाच्या योजना गरजूपर्यंत पोहचवा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:33 AM2021-08-21T04:33:10+5:302021-08-21T04:33:10+5:30
गोरेगाव : ग्रामीण व शहर येथील बूथवर महिलांची नेमणूक करून बळकटीकरण संपर्क अभियान करण्यासंदर्भात महिलांची नेमणूक करण्यात आली. या ...
गोरेगाव : ग्रामीण व शहर येथील बूथवर महिलांची नेमणूक करून बळकटीकरण संपर्क अभियान करण्यासंदर्भात महिलांची नेमणूक करण्यात आली. या तंत्रज्ञानाच्या युगात आज महिला प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असून प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. याच धर्तीवर भाजप पक्षाच्या महिलांनी केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचवण्याचे काम बूथ संपर्क अभियानाच्या माध्यमातून पूर्ण करावे असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष केशव मानकर यांनी केले.
गोरेगाव येथे बूथ संपर्क अभियान बैठकीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आमदार विजय रहांगडाले, भाजप प्रदेश सदस्य सीता रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्ष भावना कदम, जिल्हा महामंत्री तुमेश्वरी बघेले, शालिनी डोंगरे, गीता बडगे, जिल्हा उपाध्यक्ष रजनी कुंभरे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष ॲड. माधुरी रहांगडाले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाने, शहरध्यक्ष राणी बालकोठे, शहर अध्यक्ष स्वानंद पारधी, कृउबास संचालक प्रभा घरजारे, विशेष निमंत्रक गायत्री चौधरी, महामंत्री मेघा बिसेन, स्वाती चौधरी चंद्रकला कटरे, न. प. सदस्य श्वेता मानकर, सहसंयोजक वैष्णवी सोनेवाने, रंजना धुमाळ, छाया नागपुरे उपस्थित होते.