गोंदियातील कोरोना रुग्णांसाठी नागपूर जीएमसी-आयजीएमसीत १५ बेडची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 08:08 AM2020-09-15T08:08:50+5:302020-09-15T08:09:12+5:30
गोंदिया जिल्ह्यात नुकतेच रूजू झालेले जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांची माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भेट घेऊन त्यांना नागपूर येथे जीएमसी-आयजीएमसीत १५ बेड गोंदियासाठी आरक्षीत करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात नुकतेच रूजू झालेले जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांची माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भेट घेऊन त्यांना नागपूर येथे जीएमसी-आयजीएमसीत १५ बेड गोंदियासाठी आरक्षीत करण्याची मागणी केली. या भेटीत त्यांनी जिल्हाधिकारी मीना यांच्यासोबत कोरोना उपाययोजनांवर चर्चा केली.
भेटीत अग्रवाल यांनी, आजघडीला आरोग्य प्रशासन व खाजगी डॉक्टर्स आपापल्या स्तरावर संभव उपचारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र मागील ६ महिन्यांत आरोग्य प्रशासन येथे नागरिकांना वाचविण्यासाठी आवश्यक व्यवस्था उभी करू शकली नाही. शासकीय रूग्णालयांत विटामीन व आॅक्सीजन देऊन रूग्णांची प्रतिरोधक क्षमता वाढवून उपचार केले जात आहे. मात्र एंटीबायोटिक औषधांची व्यवस्था नाही. परिणामी जास्त वय असलेल्यांच्या उपचारासाठी हे पुरे नाही. खाजगी रूग्णालय भरलेले असल्याने तेथे जागा मिळणे असंभवन वाटत आहे. अशात नागपूर येथे जीएमसी-आयजीएमसी शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये जिल्ह्यासाठी किमान १५ बेड आरक्षित करावे जेणे करून गरज पडल्यास रूग्णांना गरज पडल्यास त्वरीत जागा मिळणार असे सांगीतले.
याशिवाय, शासकीय अलगीकरण केंद्रात चांगले जेवण व स्वच्छतेचा अभाव असल्याने बहुतांश रूग्ण होम क्वारंटाईन होत असून थोड्या लापरवाहीने ते कुणाच्या संपर्कात येऊन ही महामारी पसरवीत आहे. अशात केंद्रातील जेवण व स्वच्छतेत सुधार आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच सन २०१९-२० मध्ये जिल्हा नियोजन समितीने १० कोटी हून अधिक निधी जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांना आधुनिक मशीन्स लावण्यासाठी दिला होता. ज्यात १२ व्हेंटीलेटर्स खरेदीसाठी अधिष्ठातांना १.४४ कोटी रूपये मिळाले होते. मात्र आतापर्यंत आवश्यक मशीन्सची खरेदी झाली नसून वाढती रूग्ण संख्या बघता जिल्हा आरोग्य प्रशासन अपयशी ठरत असल्याचे सिद्ध होते. अशात उपलब्ध निधीतून त्वरीत मशीन्सची व्यवस्था करावी. त्याचप्रकारे नवीन सिटी स्कॅन मशीन आली असल्याने जुनी मशीन दुरूस्त करून दोन्ही मशीन सुरू करण्याची मागणी अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी मीना यांच्याकडे केली.
खाजगी डॉक्टर्सची मदत घ्या
शहरात अत्याधुनिक मशीन्सने सज्ज कित्येक रूग्णालय आहेत. मात्र फक्त ३-४ रूग्णालयांमध्येच कोरोना रूग्णांचा उपचार होत आहे. यामुळे सर्व बोझा शासकीय व्यवस्था व या ३-४ खाजगी रूग्णालयांवरच येत असून व्यवस्था विस्कटत आहे. अशात जिल्ह्यातील डॉक्टर्सची बैठक घेऊन जास्तीत जास्त कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी सहमत करावे असे अग्रवाल असा प्रस्ताव अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी मीना यांच्या पुढे मांडला. यावर मीना यांनी सर्व विषयांवर चर्चा करून त्यांची सविस्तर माहिती घेतली व त्यावर योग्य कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.