४९ हजार क्विंटल बियाणे, तर ९८ हजार मेट्रिक टन खतांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:30 AM2021-05-27T04:30:44+5:302021-05-27T04:30:44+5:30

गोंदिया : ‘धान का कटोरा’ म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आता खरिपाच्या तयारीला शेतकरी लागला आहे. जिल्ह्यात खरीप ...

Demand for 49,000 quintals of seeds and 98,000 metric tons of fertilizers | ४९ हजार क्विंटल बियाणे, तर ९८ हजार मेट्रिक टन खतांची मागणी

४९ हजार क्विंटल बियाणे, तर ९८ हजार मेट्रिक टन खतांची मागणी

Next

गोंदिया : ‘धान का कटोरा’ म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आता खरिपाच्या तयारीला शेतकरी लागला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात १८६४३१ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. यामुळे यंदा खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ४८९६० क्विंटल बियाणे, तर ९७७०४ मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे.

जिल्ह्यात धान हेच शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जात असल्याने जिल्ह्याला धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धानशेती करतो. यंदा जिल्ह्यात १८६४३१ एवढे खरिपाचे क्षेत्र असून यात धानाची लागवड केली जाते. त्यादृष्टीने कृषी विभागाला बियाणे व खतांचे नियोजन करावे लागते. त्यानुसार, यंदा कृषी विभागाने खरीप हंगामासाठी ४८९६० क्विंटल बियाणांची मागणी केली आहे, तर शेतकऱ्यांना लागणाऱ्या खतांसाठी ९७७०४ मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, मागणी करण्यात आलेल्या ४८९६० क्विंटल बियाणांतील २३३६७ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. म्हणजेच, मागणीच्या तुलनेत अर्धाच पुरवठा करण्यात आल्याचे दिसते. त्याचप्रकारे ९७७०४ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली आहे. मात्र यात फक्त ८१३२ मेट्रिक टन खतांचाच पुरवठा करण्यात आला आहे. तरी मागील १५८५७ मेट्रिक टन साठा शिल्लक असल्याने सध्या २३९८९ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे.

---------------------------------------

शेतकऱ्यांची सुरू झाली धावपळ

येत्या ७ जूनपासून मान्सून लागणार असून कधीही पाऊस आपली हजेरी लावणार, अशी चिन्हे आतापासूनच दिसत आहेत. अशात शेतकरी खरिपाच्या हंगामासाठी सज्ज झाला असून खत व बियाणांची जुळवाजुळ‌व करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे. तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने कृषी विभागाकडूनही तयारी केली आहे.

Web Title: Demand for 49,000 quintals of seeds and 98,000 metric tons of fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.