चुटियाच्या राखीला राज्यभरात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:00 AM2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:31+5:30

तालुक्यातील चुटिया येथील रहिवासी ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रीती टेंभरे या दाम्पत्याने ५ वर्षांपूर्वी गावात गीर प्रजातीच्या गायींची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली. तर गौमुत्रापासून फिनाईल व औषधेही तयार केली जातात.

Demand for Chutia Rakhi across the state | चुटियाच्या राखीला राज्यभरात मागणी

चुटियाच्या राखीला राज्यभरात मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देशेणापासून राखी निर्मिती : टेंभरे दाम्पत्याने ठेवला आत्मनिर्भरतेचा आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लॉकडाऊन काळात सर्वच उद्योग ठप्प झाल्यामुळे उद्योग व व्यवसायांमध्ये कर्मचारी कपात करण्यात आली. कोरोनाच्या भीतीमुळे लाखो कामगार आपल्या स्वगृही परतले. अशाच परिस्थितीत मात्र, तालुक्यातील ग्राम चुटिया येथील एका महिलेने आत्मनिर्भर होत अनेक महिलांना रोजगार देत आदर्श निर्माण केला आहे. ग्राम चुटिया येथील प्रीती टेंभरे यांनी गाईच्या शेणापासून राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देत महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी बनवलेल्या या इको फ्रेंडली राख्यांना जिल्ह्यासह राज्यात तसेच दुसया राज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
तालुक्यातील चुटिया येथील रहिवासी ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रीती टेंभरे या दाम्पत्याने ५ वर्षांपूर्वी गावात गीर प्रजातीच्या गायींची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली. तर गौमुत्रापासून फिनाईल व औषधेही तयार केली जातात.
कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून जनतेला आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. त्यात आता भारत-चीन सीमावादामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेतात प्रीती यांना रक्षाबंधनाच्या उत्सवात गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली राखी बनविण्याची संकल्पना सूचली. त्यांनी कामाला सुरूवात करत आधी या संकल्पनेबाबत अभ्यास केला आणि त्यानंतर आपली ही संकल्पना साकार केली. आतापर्यंत त्यांनी गाईच्या शेणापासून जवळपास ^सहा हजार इको फ्रेंडली राख्या तयार केल्या. जिल्हा व राज्यच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, राजस्थान सारख्या इतर राज्यांतही या राख्यांना मागणी आहे.
या माध्यमातून त्यांनी गावातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांना रोजगाराशी संबंधित प्रशिक्षणही द्यायला सुरु वात केली आहे. गाईच्या शेणापासून राखी कशाप्रकारे तयार करता येते, हे देखील शिकविण्यात आले.
प्रीती टेंभरे यांच्या लघु उद्योगात त्याचे पती ऋषी टेंभरे हे माकेर्टींगचे काम पाहतात. आपल्याकडे तयार केलेल्या राख्या बाजारात विक्रीकरीता जाताना कुठलीही कमी राहू नये, राख्यांना पॅक करून पोहोचविणे याकडे प्रीती यांच्या जाऊ श्वेता टेंभरे विशेष लक्ष देतात.

गौहत्या थांबविण्याचा संदेश
गाईपासून फक्त दूध न मिळविता तिच्यापासून मिळणाऱ्या शेणापासून औषधे व राख्या बनविणे इतकेच मर्यादित न राहता गौहत्या थांबविणे हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रीती सांगतात. विशेष म्हणजे, यासाठी राखीच्या मागच्या भागावर गायी वाचविण्याचा सामाजिक संदेशही दिला जात आहे. यापुढे गाईच्या शेणापासून दिवाळीनिमित्त इको फ्रेंडली दिवेदेखील बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Demand for Chutia Rakhi across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.