वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:29 AM2021-04-08T04:29:57+5:302021-04-08T04:29:57+5:30
अर्जुनी मोरगाव : सिरोली येथून मोटारसायकलने साकोली येथे जात असलेल्या युवकाच्या दुचाकीसमोर अचानक रानडुक्कर आल्याने मोटारसायकल स्वार गंभीर जखमी ...
अर्जुनी मोरगाव : सिरोली येथून मोटारसायकलने साकोली येथे जात असलेल्या युवकाच्या दुचाकीसमोर अचानक रानडुक्कर आल्याने मोटारसायकल स्वार गंभीर जखमी होऊन त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारा दरम्यान जखमी युवकाचा बुधवारी (दि.७) नागपूर येथे मृत्यू झाला. याप्रकरणी वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी मृतकाच्या भावाने केली आहे. उत्तम मोतीराम उके, रा. सिरोला, पो.महागाव असे मृतक तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार उत्तम हा आपल्या दुचाकीने २६ मार्च २०२१ रोजी साकोलीकडे जात असताना त्याच्या दुचाकीसमोर अचानक रानडुक्कर आल्याने तो खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारार्थ नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचारासाठी पाच ते सहा लाख रुपयांचा खर्च आला. मात्र उपचार सुरू असतानाच बुधवारी उत्तमचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर संकट ओढावले आहे. या घटनेस वन्यप्राणी जबाबदार असल्याने वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी उत्तमचा भाऊ देवदास मस्के यांनी वनविभागाकडे केली आहे.