धान पिकाच्या भरपाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:27 AM2021-08-01T04:27:14+5:302021-08-01T04:27:14+5:30
डासांचा प्रादुर्भाव वाढला गोंदिया : शहरातील नाल्या उपसण्यात न आल्याने कचऱ्याने तुंबल्या आहेत. परिणामी, डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात ...
डासांचा प्रादुर्भाव वाढला
गोंदिया : शहरातील नाल्या उपसण्यात न आल्याने कचऱ्याने तुंबल्या आहेत. परिणामी, डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंबंधी नगर परिषदेकडे निवेदने देण्यात आली.
बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
गोरेगाव : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने, याचा गोरगरिबांना फटका बसतो.
अल्पखर्चाचे शुभमंगल प्रेरणादायी
अर्जुनी-मोरगाव : कोरोनामुळे विवाह समारंभावरही बंधने आली आहेत. थेट आठ महिन्यांपासून बंद असलेली सामाजिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेली विवाह परंपरा सुरू झाली आहे.
दुग्ध भेसळीच्या चौकशीची मागणी
सौंदड : दुधाची आवक कमी होऊनही दुधाचे वितरण व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात येत आहे. दुधात भेसळ करून पदार्थ तयार करण्याचा सपाटा सुरू आहे. चौकशी करण्याची मागणी होत आहे.
आरोग्यसेवेकडे लक्ष देण्याची मागणी
सालेकसा : ग्रामीण भागातील आरोग्यसेवक, कर्मचारी व केंद्रात नियुक्त शासकीय डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याने, आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.
......